Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमायणी येथे ई पॉस मशीन आधार सत्यापन शिबीर संपन्न

मायणी येथे ई पॉस मशीन आधार सत्यापन शिबीर संपन्न

 

मायणी / प्रतिनिधी :-    मायणी ता खटाव जि.सातारा येथे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने ई पॉस मशीन आधार सत्यापन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तहसीलदार जयश्री आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात १८३० सदस्यांचे आधार सत्यपान करण्यात आले असल्याची  माहिती पुरवठा विभागाचे अधिकारी एस एन  शेंडे यांनी दिली.    यावेळी १७ रास्त भाव रेशन दुकानदार उपस्थित होते.
तसेच डिस्कळ  येथे दि २३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, व  दि २७ रोजी निढळ येथे सकाळी ९ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सत्यापन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांना गहू २ व तांदूळ ३ या प्रमाणे धान्य मिळत आहे  अशा लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन आधार सत्यापन करून घ्यावे असे आव्हान करण्यात आले आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular