कराड : सातारा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी उंडाळे विभागात मॅरेथॉन बैठकी घेत झंझावाती प्रचारदौरा केला. उंडाळे विभागातील लोहारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, भुरभुशी, भरेवाडी, गोटेवाडी या गावात डॉ. भोसले यांनी लोकांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने गेल्या 5 वर्षांत खूप मोठे काम केले आहे. लोक केंद्राच्या व राज्याच्या कामगिरीवर खुश आहेत. आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची असून, संरक्षण, शेती, रोजगार, पाणी या क्षेत्रातील विकासकामे व अभिनव योजना पुढे सुरु ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट गर्जत आहे. कोट्यवधींची विकासकामे केंद्र आणि राज्य सरकारने केली असून, या भागातही मोठ्याप्रमाणात निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांचे हा बळकट करण्यासाठी सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करून नरेंद्र पाटील यांना विजयी करावे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, संजय शेवाळे, संजय शेटे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सुनील जाधव, अनिल जाधव, शंकर धुमाळ, अनिल जाधव, रघुनाथ धुमाळ, आप्पा कासार, सुरेश पवार, सरपंच श्री. साठे, बाबासो पवार, किरण सावंत, संतोष मोहिते, राजू माटेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या ख्येने उपस्थित होते.
नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. अतुल भोसले यांचा झंजावाती दौरा
RELATED ARTICLES

