Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीविभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांची आकाशवाणी पुणे केंद्रावर मुलाखत

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांची आकाशवाणी पुणे केंद्रावर मुलाखत

पुणे: पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांची निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेली मुलाखत शुक्रवार दि.5 एप्रिल 2019 रोजी रात्री 9.30 वाजता आकाशवाणी च्या पुणे केंद्रावर (792 मेगाहर्ट्झ) प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक(माहिती) वृषाली पाटील व आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी तेजश्री कांबळे यांनी घेतली आहे.
या मुलाखती मध्ये मतदानासाठी आवश्यक कागदपत्र, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना, आचारसंहिता अंमलबजावणी, एमसीएमसी कमिटी चे कामकाज, मतदार जनजागृती..अशा विविध विषयांची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली आहे. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा निश्चित लाभ घ्यावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular