Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीडॉ.अजय साठे यांची नगरविकास आघाडीच्या पार्लमेंट बोर्ड सदस्यपदी नियुक्ती

डॉ.अजय साठे यांची नगरविकास आघाडीच्या पार्लमेंट बोर्ड सदस्यपदी नियुक्ती

साताराः येथील प्रसिध्द ह्दयरोगतज्ञ डॉ. बाबा साठे यांचे सुपूत्र डॉ. अजय साठे यांची नगरविकास आघाडीच्या पार्लमेंट बोर्ड सदस्यपदी आघाडीचे अध्यक्ष आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नुकतीच नियुक्ती केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या कार्यक्रमात डॉ. साठे यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. अजय साठे यांनी अधिकृतपणे नगरविकास आघाडीत त्यांच्या कार्यकर्त्यासमवेत प्रवेश केला. यावेळी आघाडीचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, डॉ. अजय साठे यांचे वडील डॉ. बाबा साठे आणि कै.आ.अभयसिंहराजे भोसले यांचे घरोब्याचे संबंध होते. डॉ. अजय साठे यांचे आजपर्यंत सामाजिक काम पाहता या तरूण तडफदार नेर्तृत्वाने नगरविकास आघाडीत केलेला प्रवेश हा अभिनंदनीय आहे. नगर विकास आघाडीच्या माध्यमातून सातारा शहराच्या सर्वागिण विकासासाठी राबवण्यात येत असलेली ध्येय धोरणे आखताना आम्हाला आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा निश्‍चितच फायदा होईल. नगर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण शहराच्या विकासासाठी पुरेपुर योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी डॉ. साठे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य डॉ.अजय साठे म्हणाले, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले योग्य नेतृत्वाखालील नगरविकास आघाडीत काम करण्याची जी संधी मिळाली आहे. त्याचा उपयोग करत नागरिकांचे, डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ करून नगरविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत राहीन असा विश्‍वासही डॉ.साठे यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल डॉ.साठे यांचे माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, अशोक मोने, नगरसेवक अमोल मोहिते, माजी नगरसेवक अविनाश कदम, राजू गोरे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular