म्हासुर्णे (तुषार माने प्रतिनिधी ) : म्हासुर्णे ता.खटाव येथील श्रीराम विद्यालय येथे भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारच्या चार वर्षाच्या यशस्वी पुर्णत्वानिमित्त मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन संपूर्ण महाराष्ट्र भर सी.एम चषक २०१८ व कला -क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे याद्धारे जास्तीत जास्त खेळाडू ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी व मुला- मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणुन कराड उत्तर मतदारसंगातील पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील म्हासुर्णे गणातील म्हासुर्णे गावात श्रीराम विद्यालय येथे रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कराड उत्तर चे भावी आमदार व जिल्हा परिषद व नियोजन मंडळ सदस्य मनोज घोरपडे, म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने,उपसरपंच सुहास माने,वडगावचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप यादव ,शरद माने ,मुख्याध्यापक पी.व्ही.हांडे,एस.के.राठोड सर,व्हि.एम.माने मँडम,देशमुख सर, बी.आर शेख सर,एस बी.म्हमाणे मँडम,पी.बी.तोरणे,पी.डी.परदेशी,ए,टी.केराम, यांनी स्पर्धेची परिक्षण करुन रांगोळी व चित्रकला स्पर्धेत नंबर काढले त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत चैताली अधिक गुरव इयत्ता नववी हिचा प्रथम क्रमांक व गायत्री संजय विभुते इयत्ता सातवी हिने द्वितीय क्रमांक तर सुप्रिया विठ्ठल पवार इयता दहावी या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच चित्रकला स्पर्धेत हर्षद सुनिल माने इयत्ता आठवी याने प्रथम क्रमांक व श्रध्दा उत्तम माने इयत्ता सातवी हिने द्वितीय क्रमांक तर माणसी जितेंद्र तोरणे इयत्ता सहावी हिने तृतीय क्रमांक मिळवला.वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व ट्राफी देवुन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये एकुण रांगोळी स्पर्धेत २४ तर चित्रकला स्पर्धेत ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याबद्दल सर्व विद्यार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या सर्व यशस्वी विद्यार्थीचे शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,राजाराम माने,रामचंद्र माने,भिमराव माने,पांडुरंग माने,किसन माने,नथुराम माने,स्वप्निल माने यांनी अभिनंदन केले.