वडूज: आयटेक संघटनेच्या वतीने सोमवार दि. 13 मे रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत वडूज येथील काळेश्वरी मंगल कार्यालयात पोषण आहार कर्मचार्यांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती खटाव तालुका मदतनीस संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी खुडे, शाळा पोषण आहार संघटनेच्या तालुकाध्यक्षा आशाताई भांडवलकर यांनी दिली.
या मेळाव्यास संघटनेच्या कार्यवाहक अर्चना अहिरेकर, जिल्हाध्यक्षा निर्मला पाटील, सुजाता रणनवरे, कविता उमाप, सुजाता पवार, उषा कुंभार आदींसह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात मदतनिसांना 75 % मानधन फरकासह मिळावे. मिनीताईंना मोठ्या अंगणवाडीचा दर्जा व मानधन मिळावे. स्वयंपाकी महिलांना 7 हजार 500 मासिक पगार मिळावा. आदी प्रश्नाबाबत चर्चा, विचार विनीमय होणार आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढा, सभासद वृध्दी आदिंबाबतही चर्चा होणार आहे. तरी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्षा अनिता जाधव, तालुकाध्यक्षा निर्मला पाटोळे यांनी केले आहे.
वडूज येथे दि. 13 रोजी पोषण आहार कर्मचारी मेळावा
RELATED ARTICLES