Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीलॉक डाऊन काळात पाटणच्या पोलिस निरीक्षक युवकाची मुंबई मिराभाईंदर येथे मोठी कारवाई...

लॉक डाऊन काळात पाटणच्या पोलिस निरीक्षक युवकाची मुंबई मिराभाईंदर येथे मोठी कारवाई ; लाखोंचा मुद्देमाल जप्त.

मुंबई:- कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर असलेल्या लौकडाऊन काळात भाईंदर आणि मिरारोड येथे बेकायदेशीर वाईनशौप बीयरबार, होटेल मधून विदेशी दारूची विक्री होत असलेली गुप्त माहिती सहा. पो.नि. प्रविणकुमार साळुंखे यांना मिळाली असता. त्यांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी टाकलेल्या छापेत ४ लाख ७० हजार रुपये किमंतीची विदेशी दारुसह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत बार मालकासह होटेल मैनेजरवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. लौकडाऊन काळातील या मोठ्या कारवाईने सहा. पो.नि. प्रविणकुमार साळुंखे यांच्यासह त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट फेज नं- ०१ जवळ असलेल्या अँक्वा फैमिली रेस्टो बार ( होटेल सतीश एन्क्लेव्ह ) या रेस्टो बार मधे व मिरारोड येथील शौप नं- १४ गौरव एक्सिलेन्सी बिल्डिंग – ०४ हटकेश जी.सी.सी. क्लब मिरारोड पुर्वजवळ असलेल्या सिंग बीयरशौप मधे लौकडाऊन बंदीकाळात बेकायदेशीर विदेशी दारुची व बीयरची विक्री होत असलेली गुप्त माहिती काशिमिरा पोलिस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रविणकुमार साळुंखे यांना मिळाली.
त्यांच्या पथकाने शुक्रवारी भाईंदर येथे अँक्वा फैमिली रेस्टो बार येथे छापा टाकला असता होटेल मालक गोपी नरसय्या नायडू हा लौकडाऊन बंदी काळात जादा दराने विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या ६० बौक्स मधून बीयर, वाईन, विदेशी दारु असा एकूण २ लाख ७ हजार ६५४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मिरारोड येथे शनिवारी सिंग बीयरशौप येथे छापा टाकला आसता मैनेजर मुनीबलाल रुद्रप्रतापलाल श्रीवास्तव हा जादा दराने विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या ९२ बौक्स मधून बीयर, वाईन, विदेशी दारु असा एकूण २ लाख ६१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकूण ४ लाख ६९ हजार ३५४ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लौकडाऊन काळात सर्वात मोठ्या झालेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पो.नि. व्यंकट आंधळे, सहा. पो.नि. प्रविणकुमार साळुंखे, विलास व्ही. कुठे, उप पो.नि. चेतन पाटील, सहा.फौ. चंद्रकांत पोशिकर, अनिल वेळे, संदीप शिंदे, किशोर वाढीले, अविनाश गर्जे, अर्जुन जाधव, अशोक पाटील, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, संजय शिंदे, प्रदीप टक्के, सतिश जगताप, राजेश श्रीवास्तव, महेश वेल्हे, विकास रजपूत, जयवंत कांडलेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular