Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीइकोफ्रेंडली गणेश मुर्ती बनवण्यासाठी आग्रह

इकोफ्रेंडली गणेश मुर्ती बनवण्यासाठी आग्रह

खटाव : पर्यावरणाचा र्‍हास, तसेच संमुलन राखण्यासाठी समाजात विविध संस्था, तसेच शासनस्तरावरुन आवाहने केली जात आहेत. त्याच धरतीवर गेल्या काही वर्षापासुन इकोफ्रंडली गणेश मुर्ती बनवण्यासाठीही आग्रह धरला जात आहे. प्लस्टर ऑफ पॅरीसच्या आकर्षक दिसणार्‍या मुर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर त्या लवकर विरघळत नसल्याने तसेच त्या पासुन पाणी प्रदुषण तसेच पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास या सर्व गोष्टी लक्षात घेउन आपल्यापासुन सुरवात करण्याचे मनाशी ठरवुन खटाव मध्ये कला शिक्षक म्हणुन कार्यरत असणारे सुनिल पाटील गेल्या सहा वर्षापासुन घरी इको फ्रेंडली गणपती बनवुन त्याची पुजा करत आहेत.
मातीच्या गणेश मुर्ती या विरघळण्यास सोप्या तसेच बनवण्यासही सोप्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. शाडु मातच्या सहाय्याने या मुर्ती बनवण्यासंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांच्यातही जागृती करण्याचे काम करत असुन या मुर्तीपासुन निश्‍चिीतच पर्यावरणाचा होणारा र्‍हा स रोखण्यास मदत होईल .तसेच या मुर्ती आपण घरच्या घरी देखील विसर्जीत करु शकतो असेही त्यांनी सािंगतले.आज खर्‍या अर्थाने अशा ईको फ्रेंडली गणेश मुर्तीची गरज असुन या करीता समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्यापासुन सुरवात केली तर निश्‍चितच आपण पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखु शकतो .
(छाया : दिपाली भोसले)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular