फलटण : स्वच्च्छ सर्व्हेक्षण – 2018 अंतर्गत राबविण्यात येत असलेली स्वच्छ व सुदर प्रभाग मोहिम हि प्रभाग स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवा असे प्रतिपादन फलटण तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी केले.
प्रभाग क्र.9 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमे अंत्रगत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरसेविका सौ.वैशाली चोरमले, माजी नगरसेवक हरिष काकडे, दादासो चोरमले, नगरसेवक जगन्नाथ कुंभार, राजू मारूडा, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश तुलसे, मुकादम आनंद डांगे, सुनिल काकडे, बंडू गायकवाड, आवळे, रमेश वाघेला, मुकबधीर विधालयाच्या मुख्याधापिक सौ.दिप्ती देसाई इ. मान्यवंर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की स्वच्छता मोहिम राबवित असताना नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवून घरातील ओल्या व सुक्या कचर्याचे विलगीकरण करून हा कचरा परिसरात न टाकता घंटा गाडीतच टाकावा तसेच प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा असे हि शेवढी रघुनाथराजे म्हणाले.
प्रास्ताविक करताना दादासो चोरमले यांनी सांगितले की प्रभाग स्वच्छता मोहिम राबवित असताना प्रभागातील नागरिकाबरोबरच फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून त्यानी त्यांच्या कडील मोठी टिम प्रभाग स्वच्छ्तेसाठी दिली आहे. त्यांच्या मदतीने हे अभियान यशस्वी करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
याप्रसंगी मुकबधीर विधालयातील दिव्यांग मुलांनी स्वच्छ फलटण सुंदर फलटण यावर स्वच्छतेचा संदेश देणारे मुक पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकाची शाब्बासकी मिळविली विशेष म्हणजे हे अभियान नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात येत असल्याचे माजी नगरसेवक हरिष काकडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
या कार्यक्रमास सौ.वैशाली शिंदे, उदय निकम, नितेष शिंदे, अजय अहिवळे, मनोज मारूडा, अजय भिसे, अजिंक्य पवार, दादासो काकडे,संतोष काकडे, चैतन्य खरात इ. मान्यवर उपस्थित होते. आभार नगरसेविका सौ.वैशाली चोरमले यांनी मानले.