कोरेगाव: ग्रामीण भागात अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी महावितरण कंपनी कटीबध्द असून, कोरेगाव तालुक्यात एक गाव एक दिवस देखभाल व दुरुस्ती उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी यांनी दिली.
महावितरणचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक गाव एक दिवस देखभाल व दुरुस्ती उपक्रम योजना ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथे नुकतीच कार्यान्वित करण्यात आली. सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वी झाली आहे, अशी माहिती महामुनी यांनी दिली. ल्हासुर्णे येथे कोरेगाव ग्रामीण शाखा क्र. 2 यांच्या अधिपत्याखाली 8 वाकलेले खांब सरळ करण्यात आले. 2 रोहित्रांची दुरुस्ती करण्यात आली. सहा ठिकाणी लूज वायरी ओढण्यात आल्या, 21 नादुरुस्त मीटर बदलण्यात आले आणि विविध कामे करण्यात आली. कोरेगाव उपविभागातील उपअभियंते, जनमित्र तसेच बाह्यस्त्रोत कर्मचार्यांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला होता. ल्हासुर्णे येथील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
महावितरण कंपनीचा एक गाव एक दिवस देखभाल व दुरुस्ती उपक्रम
RELATED ARTICLES