पाटण :- २६१ पाटण विधानसभा निवडणूक व ४५ सातारा लोकसभा पोट निवडणूकीसाठी पाटण मतदार संघात किरकोळ वाद अपवाद वगळता सगळीकडे शांततेत मतदान झाले असता दिवसभरात पाटण विधानसभा मतदारसंघात ६८% मतदान झाले. सकाळी ७ वा. पासून ते दुपारी ३ वा. पर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. नंतर मतदारांचा ओघ कमी आला. मात्र काही मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वा. पर्यंत गर्दी दिसत होती. पाटण विधानसभा मतदार संघाच्या कोयना, मोरगिरी, पाटण, मल्हारपेठ, चाफळ, तारळे, ढेबेवाडी, कुंभारगाव, तांबवे-सुपने या विभागात सरासरी ६५ % ते ७० % मतदान झाले.
२६१ पाटण विधानसभा व ४५ सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पाटण येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पाटण मतदार संघाचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व त्यांच्या परिवाराने जि.प. शाळा क्र. १ मधे मतदानाचा हक्क बजावला, शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांनी मरळी येथे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंद्रुळ कोळे तर जि. प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण येथे मतदान केले.
पाटण मतदार संघात सकाळ पासून शांततेत सुरू असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागत होत्या. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. हि गर्दी दुपार नंतर मंदावली मात्र काही ठिकाणी सायंकाळी ६ वा. पर्यंत मतदारांची गर्दी होती. मतदारसंघातील मतदान केंद्रावर उमेदवार शंभुराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या दिवसभर गाठीभेटी सुरु होत्या. तर राष्ट्रवादी चा बाल्ले किल्ला असलेल्या पाटण शहरात शंभुराज देसाई हे थळ ठोकूनच होते. मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढण्यास कार्यकर्ते व्यस्त होते. तर अनेक ठिकाणी पाटण मतदार संघात मतदानासाठी मुंबईवरून मतदारांना आणन्यात आले. पाटण मतदार संघात सरासरी ६८ % मतदान झाले असल्याचा अंदाज असुन मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकी पेक्षा घटलेली टक्केवारी कोणाच्या पत्त्यावर पडणार हे दि. २४ रोजी गुरुवारी होणाऱ्या निकाला दिवसीच कळणार.