Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीलोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज -: जिल्हा निवडणूक...

लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज -: जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल

सातारा दि. 19(जिमाका) : 45- लोकसभा मतदार संघात वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण व सातारा 6 मतदार संघ असून या मतदारसंघात एकूण 18 लाख 60 हजार 316 मतदार आहे तसेच फलटण आणि माण मतदारसंघात एकूण 6 लाख 74 हजार 631 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
45- सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 277 मतदान केंद्र तर फलटण आणि माणमध्ये एकूण 701 असे एकूण 2 हजार 978 मतदान केंद्रे आहेत. 45 सातारा लोकसभा मतदार संघात एकूण 9 हजार 31 तर फलटण आणि माण मध्ये 3 हजार 764 दिव्यांग मतदार आहेत. वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण व सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण 94 हजार 753 तर फलटण आणि माणमध्ये 3 लाख 46 हजार 476 पुरुष मतदार आहेत. 9 लाख 9 हजार 622 तर फलटण आणि माण मतदारसंघात 3 लाख 25 हजार 419 स्त्री मतदार आहेत. 45-सातारा लोकसभा मतदार संघात 9 हजार 923 तर फलटण आणि माण तालुक्यात 2 हजार 735 सर्व्हीस ओटर आहेत. वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर पाटण आणि सातारा मतदारसंघात एकूण 18 तर माण आणि फलटमध्ये 1 तृतीयपंथी मतदार आहे. 45- सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 मतदारसंघ येतात या मतदारसंघात एकूण 18 लाख 60 हजार 316 तर फलटण आणि माणमध्ये 6 लाख 74 हजार 631 अस असून आठ मतदारसंघात एकूण 25 लाख 34 हजार 947 मतदार आहेत.
जिल्ह्यात 8 ठिकाणी सखी मतदान केंद्र आहेत. तसेच मतदान प्रक्रियेसाठी 13 हजार 809 तर 8 हजार 312 स्त्री असे एकूण 22 हजार 122 अधिकारी, कर्मचारी मतदानासाठी कार्यरत असणार आहेत.
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई
आचारसंहिता भंगाचे एफएसटी व एसएसटी पथकाद्वारे फलटण येथे 1, वाई 2, कोरेगाव 3, कराड उत्तर 1 आणि पाटण 1 असे एकूण 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सीव्हिजील ॲपवर 26 तक्रारी, 1950 या टोल क्रमांकावर 7 तर प्रत्यक्ष लेखी दाखल स्वरुपात 10 तक्रारी झाल्या होत्या या सर्व तक्रारींवर कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. 1950 या टोल फ्री क्रममांकावर 619 जणांनी संपर्क साधला आहे. पोलीस विभागाकडून 1 लाख 80 हजार तर एफएसटी आणि एसएसटी पथकाकडून 9 लाख 87 हजार रोकड आचार संहितेच्या अनुषंगाने जप्त करण्यात आली आहे. तर 61 लाख 87 हजार रुपयांचा 12 हजार 436 लिटर्सचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला. तसेच अवैधरित्या बाळगलेले 2 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधितांवर 370 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular