Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीलोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज -: जिल्हा निवडणूक...

लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज -: जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल


सातारा(जिमाका) 20: सातारा जिल्ह्यात एकूण 25 लाख 34 हजार 947 मतदार संख्या असून सातारा लोकसभा मतदार संघात वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण व सातारा या 6 विधानसभेच्या मतदार संघांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष, दिव्यांग, तृतीयपंथ व सेवा मतदार असे एकूण 18 लाख 60 हजार 316 मतदार या मतदार संघात आहेत, तर फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघात एकूण 6 लाख 74 हजार 631 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
सातारा लोकसभेसह 6 विधानसभा मतदार संघात पुढीलप्रमाणे मतदारांची संख्या आहे. 9 लाख 40 हजार 753 पुरुष, 9 लाख 9 हजार 622 स्त्री, 9 हजार 31 दिव्यांग, 18 तृतीयपंथी, तर 9 हजार 923 सेवा मतदार आहेत. फलटण व माण विधानसभा मतदारा संघात पुढील प्रमाणे मतदारारांची संख्या आहे. 3 लाख 46 हजार 476 पुरुष, 3 लाख 25 हजार 419 स्त्री, 3 हजार 764 दिव्यांग, 1 तृतीयपंथी, तर 2 हजार 735 सेवा मतदारांचा समावेश आहे.
जिल्हयात निवडणूकीसाठी एकूण 2 हजार 978 मतदान केंद्रे सज्ज असून यातील लोकसभा तसेच विधानसभेसाठी 2 हजार 277 तर फलटण आणि माण मतदारसंघात 701 मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात 8 ठिकाणी सखी मतदान केंद्र आहेत. तसेच मतदान प्रक्रियेसाठी 13 हजार 809 तर 8 हजार 312 स्त्री असे एकूण 22 हजार 122 अधिकारी, कर्मचारी मतदानासाठी कार्यरत असणार आहेत.
000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular