सातारा दि. 22 (जि.मा.का.) : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणूक मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. 45- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 67.17 टक्के तर आठ विधानसभा मतदार संघासाठी 66.57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यात झालेल्या मतदानाची विधानसभानिहाय अंतिम आकडेवारी एकूण मतदार- झालेले मतदान- टक्केवारी पुढीलप्रमाणे..
वाई- एकूण मतदार-331432- झालेले मतदान-226242- टक्केवारी-68.26,
कोरेगाव- एकूण मतदार-298766- झालेले मतदान- 204237- टक्केवारी- 68.36,
कराड (उत्तर) – एकूण मतदार-292039- झालेले मतदान-198778 – टक्केवारी- 68.07,
कराड (दक्षिण)- एकूण मतदार-291859- झालेले मतदान-208512 – टक्केवारी-71.44,
पाटण- एकूण मतदार-299929- झालेले मतदान-203129 – टक्केवारी- 67.73,
सातारा- एकूण मतदार-336368- झालेले मतदान-198650 – टक्केवारी- 59.06,
फलटण – एकूण मतदार-331685- झालेले मतदान- 213790- टक्केवारी-64.46,
माण- एकूण मतदार-340211- झालेले मतदान- 225735 – टक्केवारी- 66.35.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण-1850393 इतके मतदार असून एकूण 1239548 इतके मतदान झाले असून त्याची टक्केवारी 67.15 टक्के इतकी आहे