Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअतिक्रमण मोहिम : भाजी मंडई परिसरातील 20 टपर्‍या उध्वस्त 

अतिक्रमण मोहिम : भाजी मंडई परिसरातील 20 टपर्‍या उध्वस्त 

(छाया : प्रमोद इंगळे)
सातारा : सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी सातारा शहरातील रविवार पेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील टपर्‍या, शेड, बाबू यांचे रस्त्यावरील अतिक्रमणे एक जेसीबी मशिनद्वारे उध्दवस्त करण्यात आली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकातील निरीक्षक प्रशांत निकम, शैलेश अष्टेकर, श्री. गोडसे व कर्मचार्‍यांच्या फौजफाट्याने रविवार पेठेतील जुनी समर्थ भाजी मंडर्स परिसरात पान टपर्‍या, शेड, गाडे लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली होती. या ठिकाणी वाहन पार्कींगचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. पादचार्‍यांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत होती. रस्त्याच्या कडेला गाडे लावून तयार कपडे, मोबाईल, तसेच फुले, गजरे विकली जात होती. हि अतिक्रमणे आज सातारा पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केली. आज 15 ते 20 अतिक्रमणे हटविण्यात आली. बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 रोजी भाजी मंडईत पुढे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरु राहणार आहे. तसेच मंगळवार तळे परिसरात रस्त्याच्याकडेला बसत असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सातारा बसस्थानक ते सातारा तहसिल कार्यालया दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असणार्‍या फेरीवाल्यांना पालिकेने दिलेल्या जागेवर बसावे म्हणून लेखी नोटीस दिल्या आहेत. येत्या चार दिवसात फुटपाथवरील फेरीवाले स्वत:हून स्थलांतर झाले नाहीत तर अतिक्रमण विरोधी मोहीम सातारा बसस्थानक ते सातारा तहसिलदार कार्यालया दरम्यान तीव्र करण्यात येईल अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दूरध्वनीवरुन आमच्या प्रतिनिधीला दिली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular