म्हासुर्णे :- (प्रतिनिधी तुषार माने) हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान जयराम स्वामी वडगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.विजेत्यांना हुतात्मा दिनी हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले
स्पर्धाचे आयोजन वडगाव येथील जयराम स्वामी विद्यालयात घेण्यात आल्या होत्या.इयत्ता पाचवी ते सातवी गटात म्हासुर्णे येथील श्रीराम विद्यालयाची विद्यार्थीनी कु.आरती आण्णा माने या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक मिळवला व आठवी ते दहावी मोठया गटात कु प्रीती आण्णा माने हिने प्रथम क्रमांक मिळवला.त्याबद्दल त्या विद्यार्थीनीला कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील,माजी आमदार प्रभाकर घार्गे,सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापपती शिवाजी सर्वगोड,जि.प.सदस्य मानसिंग जगदाळे,व मार्गदर्शक शिक्षक परदेसी पी.डी(सर)यांच्या उपस्थितत बक्षिस देण्यात आले या यशाबद्दल श्रध्दा माने हिचे श्रीराम विद्यालयाचे चेअरमन महादेव माने,व्हा.चेअरमन शिवाजी माने,सेक्रेटरी राजाराम माने,सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,शाळेचे मुख्याध्यापक पी.व्हि.हांडे,उपशिक्षक राठोड सर व सर्व शिक्षक म्हासुर्णे गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे निबंध स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES