सातारा दि. 29 ( जि. मा. का ) : जिल्ह्यात सध्या शेती हंगाम चालू होणार असल्याने शेतीविषयक बि-बियाणे, खते औषधे इ. यांची वाहतुक होणे आवश्यक असल्याने क्रिमिनल प्रोसिजन कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारानुसार शेतीविषयक बि-बियाणे, खते औषधे इ. यांची वाहतुक (कंपनी, कारखाने-रेल्वे रॅक-डिलर-डिस्ट्रीब्युटर) दिवसभर चालु ठेवण्याकरीत खालील अटी व शर्तींसह अधिन राहुन सुट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. तसेच बि-बियाणे, खते, औषधे इ. ची विक्री शेतकरी सेवा केंद्रामार्फत सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच करण्यात यावी. कराड सध्या लॉकडाउन मध्ये असल्याने ही सूट कराडला लागू नाही.
विक्री व वाहतुक करतांना सॅनिटायझरचा वापर, नाक व तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे इत्यादिंचे पालन करणे बंधनकारक राहील. दि. 17 एप्रिलच्या शासन निर्णयात दिलेल्या आदेशानुसार कोविड-19 बाबत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचना व त्यासोबत जोडलेले परिशिष्ट 1 व 2 चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भा. दं. वि. 1860 चे कलम 188 व इतर कायद्यातील लागू असलेल्या दंडात्मक तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
00000