Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीफलटण एसटी स्थानकात प्रचंड चिखलाचे साम्राज्य, प्रवाशांची गैरसोय

फलटण एसटी स्थानकात प्रचंड चिखलाचे साम्राज्य, प्रवाशांची गैरसोय

फलटण ः पावसाळा सुरू झाला असतानाही थोडा जरी पाऊस पडला की एसटी स्थानकात प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असून या मधून मार्ग काढताना प्रवाशांना खूप त्रास होत असून फलटण बसस्थानकात ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही चिखलाची मालिका फलटणकरांना कधी सुटका मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठेकेदाराला हे काम पूर्ण करता येत नसल्याने काळ्या यादीत टाका अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
फलटण बस आगार म्हणजे समस्यांचे आगार अशी भावना झाली असून बस स्थानक नूतनीकरण साठी महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र आजही सदर ठिकाणी फारच संथपणे व निकृष्ठ असे काम सुरू असल्याची बाब नागरीक व्यक्त करीत आहेत. बस स्थानकातील अधिकारी व ठेकेदार यांच्यातील आर्थिक हितसंबंध असल्याचे बोलले जात असून बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी गेली तीन वर्षे झाले निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र ठेकेदाराला या कामात जुने बांधकाम वापरायचे असल्याने जुन्या बांधकामाबाबत त्या ठेकेदाराला कोणीही टोकत नसल्याने या ठेकेदाराबाबत एवढी माया कोणाला माया मिळत आहे का? असा सवाल प्रवाशी विचारत आहेत.
ठेकेदाराच्या आडमुठ्या काम करणार्‍या पद्धतीमुळे बस स्थानकातील समस्या कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली आहे. सदरच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून याठिकाणी प्रवास करणार्‍या विद्यार्थी व वृद्धांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. फलटण बस स्थानकाचे काम जाणून बुजून रखडवले असल्याने याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular