Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीव्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून जळीतग्रस्त शेतकरी राजाराम पवार यांना एक लाखाची मदत.

व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून जळीतग्रस्त शेतकरी राजाराम पवार यांना एक लाखाची मदत.

 

पाटण:- माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे याला माणुसकी म्हणतात या माणुसकीच्या भावनेतून पुणे-मुंबई सारख्या शहरात कुटुंबिक उपजिविकेच्या साधने साठी राहणाऱ्या पाटण तालुका मित्र परिवार व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून एक लाख रुपये ची अर्थिक मदत जमा करून तामकडे ता. पाटण येथील जळीतग्रस्त शेतकरी राजाराम पवार यांना देताना मोबाईल च्या औनलाईन जमान्यात देखील माणसासाठी चांगल्या माणसांच्या मनात माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले. या ग्रुप सारखा आदर्श इतर ग्रुप नी देखील घेतल्यास सर्वसामान्यातील सामान्य माणूस म्हणून जगणे आदर्शवत ठरेल. असे ग्रुप प्रमुख गणेश सांळुखे यांनी एक लाख रुपये मदतीचा चेक शेतकरी राजाराम पवार यांना ग्रुपच्या माध्यमातून देताना सांगितले.

यावेळी पाटण तालुका मित्र परिवार व्हाट्सएप ग्रुपचे सदस्य भास्कर साळुंखे, सिद्धार्थ सत्वधीर, भगवान भोळे, मारूती पाटील, मोहन घाडगे, मधुकर साळुंखे, सदाशिव पवार, विशाल डिगे, अनिल साळुंखे, सुरज देसाई, संजय कांबळे यांच्यासह इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी रहिवासी असलेल्या पाटण तालुका मित्र परिवार व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून पाटण तालुक्यातील तामकडे येथील भुमीपुत्र जळीत कृषीधन बाधित शेतकरी बांधवाला माणुस्कीच्या कर्तव्याप्रती नैतिक जबाबदारी म्हणुन एक-लाख रुपयेचा धनादेश देण्यात आला. बुधवार दि. २० मार्च शिमग्याच्या होळी दिवशी राजाराम पवार तामकडे यांच्या माळावरील गुरांच्या गोठ्याला दुपारच्या तापत्या उन्हात भीषण आग लागुन बारा पशूधन जनावरांचा अंत झाला. दुध दुभत्या, गाभण म्हैशी, गाई शेतामध्ये राबणार्‍या बैलांचा यात समावेश होता. हि बातमी वाऱ्यासारखी प्रसिद्धी माध्यम, सोशल मिडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरताच पशुसंवर्धन पशुप्रेमी राजाराम पवार यांच्यावर कोसळलेले दु:ख शेतकऱ्यांच्या मुलांनीच जाणले. लाखांचा पोसिंदा असलेल्या या शेतकऱ्यांवरील आलेले मोठे संकटाचे गांभीर्य ओळखुन पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी कामानिमित्त असणाऱ्या पाटण तालुका मित्र परिवार या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून मेष्टेवाडी ता. पाटण येथील गणेश सांळुखे यांनी जळीतग्रस्त शेतकऱ्यांसाठी अर्थिक मदतीचे अहवान केले. या अहवानाला प्रतिसाद देत ग्रुप मधील १३० सदस्यांनी आप-आपल्या परिने मदत जमा करण्यास सुरवात केली. ग्रुप वेतिरीक्त इतर बांधवांनी देखील या अहवानाला प्रतिसाद देत मदत दिली. हि मदत एकुण एक लाख रुपये जमा झाली असता सर्व ग्रुपच्या सदस्यांनी तामकडे येथे प्रत्यक्ष गावी येऊन राजाराम पवार या शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदतीचा धनादेश प्रधान केला.

यावेळी दिलिप सपकाळ, सिध्दार्थ सत्वधिर, राजाराम पाटील, भगवानराव भोळे, भास्कर सांळुखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर तामकडे गावचे सरपंच बाळासाहेब पवार, उपसरपंच संजय पवार यांनी सर्वांचे स्वागत केले तर विलासराव पवार सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून सर्वांचे आभार मानले. यावेळी दीपक मांडावकर, संजय पाटील, कृष्णा मांडवकर, सुरेश मांडवकर, डिंगबर जाधव, दत्ता पवार, आकाश सुतार, यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular