पाटण :- भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्याच्या वतीने पाटण येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपा पक्षप्रवक्ते भरत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पाटण तालुका भाजपा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाटण तालुका भाजपा अध्यक्ष पदी फत्तेसिंह पाटणकर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. तर माजी अध्यक्ष कमलाकर पाटील यांची सातारा जिल्हा चिटणीस पदी बढती करून नेमणूक करण्यात आली. या निवडी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष मा सौ कविताताई कचरे, महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.आयेशा सय्यद, विस्तारक रावसाहेब क्षिरसागर यांचे प्रमूख उपस्थितीत झाल्या.
यावेळी नुतन तालूकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्यामधिल गटा तटाचे असणारे राजकारण संपुष्टात आणुन भाजपाचे माध्यमातुन पाटण तालूकयाला केंंद्र, राज्य सरकार, पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी यांचे सहकार्याने नविन विकासाची दिशा दाखवु असा आत्मविश्वास व्यक्त केला. पाटण तालूक्यात पक्ष बांधणी व मजबुतीकरण केले जाईल , तसेच पक्षाचे माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या तळागाळातिल लाभार्थ्याला देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बैठकीस ऊपस्थित सातारा जिल्हाउपाध्यक्ष सागर माने, चंद्रकांत भिसे तालूकाध्यक्ष भाजपा अनूसूचित जाती आघाडी, दिपकराव महाडीक, रामभाऊ लाहोटी, नानासो सावंत, नंदकुमार सुर्वे, लहुराज पवार, अनुप सुर्यवंशी, अनिल बोधे, रविंद्र मिसाळ, योगेश महाडीक , काशिनाथ विभुते, गणेश खांडके , सागर जाधव , चंद्रकांत गव्हाणे, सचिन जाधव, धिरज कदम, प्रविण ऊदुगडे, समिर भोसले आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नुतनीकरण तालुका अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, जिल्हा चिटणीस कमलाकर पाटील यांचे अभिनंदन केले.
फत्तेसिंह पाटणकर यांची भाजपाचे पाटण तालूकाध्यक्ष पदी निवड.
RELATED ARTICLES