Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमाने देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांचां सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या हस्ते गुणगौरव.

माने देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांचां सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या हस्ते गुणगौरव.

पाटण:- ( शंकर मोहिते ) – माने देशमुख विद्यालय पाटण येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय उल्लेखनीय यश संपादन केले बद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सातारा येथे शिक्षणदिना निमित्त आयोजित केलेल्या शिक्षक गौरव कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी कु तन्वी चाळके, कु. तन्वी शिंदे, कु. वैष्णवी गायकवाड यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईक – निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, बालकल्याण महिला समितीच्या सभापती वनिता गोरे, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, कृषी सभापती मनोज पवार, मानसिंगराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामराजे नाईक – निंबाळकर म्हणाले शिक्षकी पेशा हा विद्यार्थ्यां बरोबर समाज घडविणारा पेशा आहे. आपली मुले कोणत्या क्षेत्रात जाणार आहेत त्यासाठी मुलांच्या मेंदूत काय आहे. हे शिक्षकांनी शोधून काढून त्यांना शिकविले पाहिजे. तरच ग्रामीण भागातील मुले विविध क्षेत्रात पुढे जातील. इंटरनेट सोशल मीडिया सारख्या युगात या माध्यमाचा चांगला वापर करून विद्यार्थ्यांना माहिती च्या मोहलात रमवा. आणि शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. असे त्यांनी सांगितले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, डॉ. कैलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, माने देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक- चव्हाण एस आर. चव्हाण बी. पी, सौ. शोभा कदम, सवाखंडे एस.डी , शिर्के आर एल, माळी एस एम, देसाई एम जे, मोहिते जे ऐ, पवार एस एम, पाटील आर एस, मगरे एस एन. यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular