Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीफ ेरीवाल्यांचे होणार ऑनलाईन सर्वे, केंद्र शासनाचा निर्णय

फ ेरीवाल्यांचे होणार ऑनलाईन सर्वे, केंद्र शासनाचा निर्णय

कराड: केंद्र शासनाच्या दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने शहरातील फेरिवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर फेरीवाल्यांना ओळखपत्र व हातगाडा परवाना देण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर फेरीवाल्यांना ओळखपत्र व हातगाडा परवाना देण्यात येणार आहे. यासाठीची आवश्यक पूर्तता झाली असुन लवकरच या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.
शहरातील रस्त्यावर लहान, मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या फेरीवाल्यांना संरक्षण देऊन त्यांची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठीकेंद्र शासनाच्या माध्यमातुन दिनदयाल अंत्योदय येाजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातुन कराड नगरपालिकेने शहरातील सर्व फेरीवाल्याचे मोबाईलद्वारे ऑनलाईन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वेक्षणासाठी एजन्सीची नेमणुक करण्यात आली असुन लवकरच सर्वेक्षणाच्या कामास सुरूवात होणार आहे.
या योजनेंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षण झालेल्या सर्व फेरीवाल्यांना नगरपालिकेच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यंाना हातगाडे परवाने देण्यात येणार आहेत. तसेच विविध बँकाच्या माध्यमातुन अशा व्यावसायिकंाना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परवानाधारक फेरविल्यांना शासनाच्या माध्यमातुन विमा संरक्षणही देण्यता येणार आहे. नगरपालिकेच्या वतीने हातगाडा चालकांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षणही या येाजनेंतर्गत देण्यात येणार आहे. हातगाडा चालकांचा प्रश्‍न सुटण्यास मदत. जुन्या सर्वेक्षणनुसार नगरपालिकेकडे 1 हजार 215 हातगाडयांची नोंद आहे. अनेक दिवसांपासुन कराडला हॉकर्स झोनचा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. झोनच्या मुद्यावरून हातगाडा संघटना व नगरपालिकेत वारंवार संघर्ष होत आहे. मात्र शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्‍न सुटला नाही. मात्र ऑनलाईन सर्वेक्षणामुळे शहरातील हातगाडा चालकांचा हा प्रश्‍नही सुटण्यास मदत होणार आहे. हातगाडा चालकांनीही या योजनेचे स्वागत केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular