Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीफोर्स मोटर्सतर्फे सातारा येथील  आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट  

फोर्स मोटर्सतर्फे सातारा येथील  आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट  

 सातारा : पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक, फोर्स मोटर्स चे प्रमुख डॉ.अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स तर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. हा सोहळा आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.
 सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक,आर्याग्ल हािॅस्पटलचे संचालक आणि जनता सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब जाजू  यांनी या रुग्णवाहिकेचे पुजन केल्यानंतर गाडीच्या चाव्या फिरोदिया यांचे नातू चि.अमेय फिरोदिया आणि चि. अनंत फिरोदिया यांनी बाळासाहेब जाजू यांचेकडे प्रदान केल्या.
 सातारा येथील मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख संचालक अजितशेठ मुथा यांचे मुथा परिवारानेही मोठे योगदान आर्यांग्ल हॉस्पिटलचे उभारणीत दिले असून फिरोदिया यांनीही  ही मोठी बहुउपयोगी मदत करुन रुग्ण सेवेच्या करिता एक आदर्श देणगी दिल्याने आर्यांग्ल हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणार्‍या गोरगरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे असे उद्गार बाळासाहेब जाजू यांनी सांगितले.
याप्रसंगी मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख संचालक अजितशेठ मुथा,अनुप मुथा, आशिष गांधी,सुजीत मुथा, आर्यांग्लचे प्रा.विलास जगताप, डॉ. प्रकाश चव्हाण, डॉ.नितीन अरसूळे, डॉ.उमेश करंबेळकर, विनोद झंवर, आर्यांग्ल हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular