Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीविना परवाना चित्रपट शुटींग वन विभागाने बंद पाडले

विना परवाना चित्रपट शुटींग वन विभागाने बंद पाडले

महाबळेश्‍वर: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अमिन सलिम हाजी हे आपल्या आगामी कोई जाने ना या चित्रपटाचे शुटींग रात्रीच्या वेळी विनापरवाना वेण्णालेक परीसरात करीत असताना आढळुन आल्याने वन क्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्या पथकाने धडक कारवाई करीत 12 वाहनांसह सुमारे 1 कोटीं पेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी निर्माते व दिग्दर्शक अमिन सलिम हाजी सध्या रा पांचगणी वय 48 यांचेवर वन विभागाचे अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईने शहरात एकच खळबळ माजली आहे.
गेली दोन आठवडयां पासुन रहस्यमय कथा असलेल्या काई जाने ना चित्रपटाचे शुटींग येथील इगल नेस्ट या खाजगी बंगल्यात व परीसरात चालु होते चित्रपट रहस्यमय असल्याने त्या मध्ये रात्री जंगलामधील काही दृश्य आहेत ही दृश्ये चित्रित करण्यासाठी वन विभागाची परवाणगी न घेता रात्री साडे आठ वाजता या युनिटने वेण्णालेक पेटीट रोड दरम्यान चित्रिकरण सुरू केेले रात्री दहाच्या दरम्यान ही खबर वन विभागाचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांना मिळाली त्यांनी आपल्या सोबत वनपाल सुनिल लांडगे वनरक्षक लहु राउत रमेश गडदे सहदेव भिसे ज्योती घागरे संगिता देसाई व विदया घागरे यांना बरोबर घेवुन फॉरेस्ट कंम्पार्टमेंट 73 मधील घनदाट जंगलात चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याचे दिसुन आले त्यांनी तातडीने चित्रपटाचे शुटींग बंद पाडले व चित्रपटाचे शुटींग साठी वापरण्यात आलेली थार , कॉलिस , इनोव्हा , टेम्पो व इरटीगा अशी एकुन 12 वाहने व कॅमेरासह इतर सर्व 1 कोटींपेक्षा अधीक रक्कमेचे साहीत्य जप्त केले.
या प्रकरणी महाबळेश्‍वर वन विभागाने चित्रपट निर्माते अमिन सलिम हाजी यांचेवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26चा 1 एस ई व भारतीय वन व महाराष्ट सुधारण अधिनिमय 2013 चे कमल 26 चे कमल ए ए या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
महाबळेश्‍वर येथे शुटींगसाठी परवान्याची पध्दत किचकट व वेळकाढु होती त्या मुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी महाबळेश्‍वरकडे येणे टाळले होते या बाबत येथील माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांनी वनक्षे.त्रपाल यांची भेट घेवुन परवान्याची पध्दत सुलभ करण्याची विनंती केली होती त्या नुसार गेली एक वर्षा पासुन ही पध्दत सोपी करण्यात आली होती एक दिवसाला 25 हजार रूपये शुल्क घेवुन चित्रपटाच्या शुटिंगसाठी परवाणगी दिली जाते ही परवाणगी सुर्योदया पासुन सुर्यास्ता पर्यंत असते महाबळेश्‍वरच्या घनदाट जंगलात वन्य प्राण्यांची संख्या मोठया संख्येने वाढली आहे त्या मुळे रात्रीचा जंगलातील वावरावर बंदी घालण्यात आली आहे ज्या ठिकाणी चित्रपटाचे शुटींग सुरू होते त्या भागात गव्यांचे कळप फिरतात हे गव्यांचे कळप जर बिथरले तर ते मानसावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे रात्रीच्या शुटींगसाठी वनक्षेत्रात परवाणगी दिली जात नाही अशी माहीती वनक्षेत्र पाल रणजीत गायकवाड यांनी दिली वनपाल एस के नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular