पाटण दि. १६ :- ( शंकर मोहिते ) – पाटण महालातील प्रमुख असलेला सह्याद्रीच्या पर्वत रांजीत निसर्ग सानिध्यात वसलेल्या सुंदरगडाच्या ( घेरादात्तेगड ) सुशोभीकरणासाठी उतरलेल्या शिवमावळ्यांच्या बरोबर श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी ही सुंदरगड सुशोभीकरणासाठी शिवमावळ्यांना प्रोस्ताहित साथ द्यायची ठरवली असून शासनाच्या कोणत्याही मद्तीविना सुंदरगड सुशोभिकरण करून दाखविण्याचा निर्णय श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या साथीने छत्रपती शिवमावळ्यांनी घेतला आहे.
पाटण महालातील प्रमुख असलेला किल्ला सुंदरगड ( घेरादात्तेगड ) कडे महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या पुरातन विभागाने दुर्लक्ष केले आहे. सुंदरगड हा इतिहासिक पुरातन ठेवा आहे. पाटण महालाचा प्रमुख आणि इतर परिसरातील किल्ल्यावर निगराणी राखणारा देखील किल्ला आहे. या किल्ल्याच्या भवताल चा परिसर निसर्गाची देण आहे. येथील निसर्गाच्या प्रेमात अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही पडेल असा निसर्ग परिसर आहे. या किल्ल्यावरून सकाळी सुर्योदय आणि सायंकाळी सुर्यास्त हे दोन्ही सनसेट अनुभवता येतात. या बरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांजीत कोयना नदीचा नागमोडी प्रवाह, भैरवगड, गुणवंतगड, किल्ले वसंतगड यांचेही सहज दर्शन सुंदरगडावरून होते. किल्ल्यावरील तलवार विहीर, मुख्य प्रवेशद्वारातील गणेश, हनुमान मंदिर हे किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहेत. म्हणुनच हा किल्ला सुशोभिकरण करण्यासाठी शासनाच्या मदतीची वाट न पाहता छत्रपती शिवमावळ्यांच्या श्रमदानातून सुशोभिकरण करण्याचा निर्णय श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या बरोबरीने सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे शंकरराव कुंभार, चंद्रहार निकम, काशीनाथ विभूते, शंकर मोहिते, मनोहर यादव, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, निलेश फुटाणे, अनिश चाऊस, महादेव खैरमोडे, अविनाश पराडकर, राजेंद्र सांळुखे यांनी घेतला आहे.