सातारा : सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे वाढदिनाचे औचित्य साधुन येथील सीएट टायर्सच्या राज एस्कॉर्टस व सातारा जायंटस ग्रूपचे संयुक्त विद्यमाने पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा येथे महामार्गावरील वाहन चालकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
पुणे रस्त्यावरील लिंब खिंडीनजीकच्या हॉटेल कृष्णा येथे या शिबीराचे यशस्वी संयोजन राज एस्कॉर्टसचे रणजीत सावंत यांनी केले होते.श्री.छ. उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी म्हणून महामार्गवर सतत वाहने चालवत ये-जा करणार्या वाहनचालकांचे करिता हा उपक्रम खास करुन आपण राबविला व या शिबीरात तब्बल 131 लोकांचे डोळे अत्याधुनिक लेसर मशिनचे सहाय्याने मोफत तपासणी करण्यात आली अशी माहिती यावेळी रणजीत सावंत यांनी दिली.
या शिबीरात जायंटस ग्रुपचे वतीने 2 जनरल प्रॅक्टीशनर्स डॉक्टरांचे मदतीने चालकांची रक्दाब,वजन तपासणी करुन नेत्र तज्ञांकडून डोळे तपासणी करुन वाहन चालकांना पुढील संभाव्य चष्म्यांचे नंबर काढणेसाठी,मोतीबिंदूची तपासणी तसेच गरज पडल्यास डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन घेणेबाबत सल्ला देण्यात आला.
या शिबीराचे साठी क्रशर मालक संघटनेचे सुहास गिेजरे,राहूल दरेकर, विजय चौगुले,परीश ठक्कर आदींचे सहकार्यं लाभले. शिबीराचे यशस्वी संयोजनासाठी उमेश मोहीते,रोहन खटावकर,वैभव मांडवे आदींनी परिश्रम घेतले.
वाहन चालवताना वारंवार होणारी डोळ्याची जळजळ,कमी झोप,डोळे लाल होणे आदी अनेक व्याधी व तक्रारींसाठी डोळे तपासणी करण्याची इच्छा असूनही वेळ मिळत नव्हता मात्र या शिबीराने मोठी सोय झाल्याचे समाधान अनेक वाहन चालकांनी व्यक्त करुन संयोजकांचे आभार मानले.