Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसुंदरगडासह पाटण परिसरात गणेश जयंती उत्साहात साजरी

सुंदरगडासह पाटण परिसरात गणेश जयंती उत्साहात साजरी

पाटण दि.:- पाटण महालाचा प्रमुख किल्ला असलेल्या सुंदरगडावर छत्रपती शिवभक्तांनी गणेश जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी येथील पुरातन गणेश मूर्तीला अभिषेक करुन गणेश पुजन केले. तसेच वीर हनुमान, तलवार वीहिरीतील शिव लिंगाला अभिषेक करून सुंदरगडाची दुर्ग पुजा केली. यावेळी जेजुरी नगरपालिका आणि खंडोबा देवस्थान ट्रस्टचे स्वच्छता ब्रॅंड अंभिसिटर विजयकुमार हरिश्चंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयकुमार यांनी येथील उपस्थित छत्रपती शिवभक्त तरुणांना महाराष्ट्राचे गडकोट किल्ले आणि आजची तरुणाई यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

गणेश जयंतीनिमित्त सुंदरगडावरील पुरातन गणेश मूर्ती च्या दर्शनासाठी सकाळपासून गडावर शिवभक्त दुर्ग प्रेमीचीं रिग लागली होती. गडावरील गणेश मूर्तीला शिवभक्तांनी अभिषेक केला. त्याचवेळी येथील वीर हनुमान व तलवार विहिरीतील शिव लिंगाला अभिषेक करून सुंदरगड दुर्ग पुजन केले. यावेळी जेजुरी नगरपालिका चे स्वच्छता दुत ब्रॅंड अंभिसिटर विजयकुमार हरिश्चंद्रे म्हणाले महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे आजच्या पिढीला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्भुत ठेवा होय. हा ठेवा जपने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास जपने होय. इंटरनेट च्या युगात आँनलाईन ईतिहास जानण्यापेक्षा गडकोट किल्यावर प्रत्यक्ष केलेली भ्रमंती तिथला अभ्यास करणे म्हणजे छत्रपतीनां जाणून घेणे होय. पाटण मधिल शिव भक्तांनी सुंदरगडावर केलेले कार्य उल्लेखनीय असून या कार्याचा महाराष्ट्रातील तरुणांनी आदर्श घेण्यासारखाच आहे. सुंदरगडावरील स्वच्छता आणि गडावरील अदृश्य झालेला ईतिहास कालिन ठेवा उघडा करून सुंदरगडाचे खरे सौंदर्य सर्वांसमोर आणले आहे. यामुळे गडाच्या पर्यटन वाढीस नक्कीच चालना मिळेल. असे त्यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती शिवभक्त शंकरराव कुंभार, काशिनाथ विभुते, महादेव खैरमोडे, शंकर मोहिते,अनिल बोधे, निलेश फुटाणे,यश जमदाडे, राजेश सुतार, सुनील शिंदे, अतुल माने, सुरज उदुगडे.यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
याबरोबर पाटण येथील हनुमान गणेश सेवा मंडळ, प्रताप सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड, मोरेश्वर मंदिर मोरे गल्ली,जय भारत तरूण मंडळ चाफोली रोड या सार्वजनिक मंडळांनी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. गणेश जयंतीनिमित्त दिवस भर अभिषेक,होम हवन, महाप्रसादाचे आयोजन सर्व मंडळांनी केले होते. गणेश दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती. या सर्व कार्यक्रमांचा गणेश भक्तांनी लाभ घेतला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular