म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने )-: म्हासुर्णे येथील संत बाळु मामा गणेश मंडळाची उत्साहात मिरवणूक सुरु झाली या मंडळाची मिरवणूक अतिशय साध्या पध्दतीने काढण्यात आली डॉल्बी बंदी असल्यामुळे या वर्षी मंडळाने पर्यावरण संतुलन राहण्यासाठी साध्या पध्दतीने “गणपती बाप्पा मोरया” घोषणा देवुन मिरवणूक काढुन या मंडळाने गावा समोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे सर्व स्तरातुन या मंडळाचे कौतुक होत आहे डॉल्बी बंदी असल्यामुळे गणेश विसर्जनवेळी विठ्ठल बिरुदेव गजी मंडळाचा गजी नृत्याचा कार्यक्रम गावातील सर्व मिरणुकीत सर्वाचे लक्ष केंद्रित करत होते या गजी मंडळात लहान मुला पासुन वयोवृध्द लोकांच्या पर्यत सर्वानी सहभाग घेतला होता या गजी मंडळाने आतरी तीन पावठी घाई,ताळी घाई,बैठकी घाई,पैलवानी घाई,गिरकी घाई,गोफ घाई अशा अनेक घाईवर आपला कला नृत्याच्या रुपात सर्व म्हासुर्णेकरांना दाखवली.सर्व मिरवणीतुन या पांरपारीक गजी नृत्याकडे लोक अतिशय कुतुहालपणे पाहत होते डॉल्बी बंदी मुळे जुन्या लोकांचा कला अविष्कार लोंकांना पहावयास मिळाला.सर्व मिरवणुकीत संत बाळु मामा गणेश मंडळाचा वेगळेपणा प्रखर पणे जाणवत होता.चांगला उपक्रम राबवल्याबद्दल या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
म्हासुर्णे येथील संत बाळु मामा गणेश मंडळाची गजी नृत्यासह उत्साहात विसर्जन मिरवणूक
RELATED ARTICLES