पाटणः- ( शंकर मोहिते )- भक्तांच्या घरी दहा दिवसांच्या मुक्कामा नंतर पाटण शहर व परिसरात गणपतींना उत्साहपुर्ण वातावरणात “पुढच्या वर्षी लवकर या”.. च्या आमंत्रण जय घोषात मिरवणूकीने पारंपारिक बँड, बँजो, लेझिम ढोल च्या गजरात निरोप देण्यात आला. मानाच्या हणुमान सेवा मंडळाच्या गणपती दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. अनंत चतुर्थीच्या मुहर्तावर सकाळपासुन घरगुती गणपती सह सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुकींची जय्यत तयारी सुरू होती. सार्वजनिक गणपतींचे मिरवणूक देखावे लोकांचे आकर्षण ठरत होते. गणपतींची विसर्जण मिरवणूक पाहण्यासाठी अबालव्रुदांसह नागरीकांनी गर्दी केली होती.
अनंत चतुर्थी ला दुपारच्या सुमारास घरगूती मानाचा सरदार पाटणकर घराणातील गणपती पालखीतून विसर्जणासाठी वाड्यातून बाहेर आल्यानंतर त्या पाठोपाठ पाटण शहरातील सर्व घरगूती गणपती विसर्जण मिरवणूकीत सामिल झाले. घरगूती गणपतींना निरोप देऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती विसर्जण मिरवणुकीस सुरवात झाली. मानाच्या हणुमान सेवा मंडळाच्या विसर्जण मिरवणुकीत आकर्षण सिंहासनवर गणपती विराजमान केले होते. अष्टगंध मंडळाचा रूद्ररुप अवतारी शंकर लक्षवेधक होते. समाज सेवा संघाने आकर्षक हरणाचा देखावा केला होता. प्रताप सेवा मंडळाची मयुर प्रभावळ सर्वांची आकर्षण ठरत होती. शिवाजी उदय मंडळाने ढाल-तलवार साकारली. शिवलिंग मंडळाचा मरठा फेट्यातील गणपती लक्षवेधक होता. श्रीराम मंडळाची आकर्षक फुलांची सजावट होती. कलाकार मंडळाने पाऊसाळी छत्र्यांचा कल्पनिक देखावा लक्षवेधक ठरवला होता. तर नवरत्न, अष्टविनायक, गजानन, रणजित, जय भारत, चव्हाण गल्लीचा राजा या मंडळांचे देखावे सर्वांचे लक्ष वेधत होते.
तर अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी पाटण शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळा पैकी नुतन तरुण मंडळाच्या गणपतीचे विसर्जण झाले. दिपमाळेवर बसविलेला गणपती सर्वांचे अकर्षण ठरले होते. या गणपती बरोबर ग्रामस्थ मंडळ पिंपळोशी चा अमर जवान देखावा लक्ष वेधक ठरला. छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड, जिप चालक-मालक संघटना, विज महावितरण कंपनी पाटण, चौधरी गल्लीचा राजा, भोईगल्लीचा राजा, आदी गणपतीच्यां विसर्जण मिरवणूका बँड-बँजोच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पडल्या. गणपती विसर्जण मिरवणूकीत डी.वाय.एसपी. अगंध जाधववर,पो.नि. उत्तमराव भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पाटणमध्ये सार्वजनिक गणपती सह घरगुती गणपतींना उत्साहात निरोप
RELATED ARTICLES