Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकलाशिक्षक घनःश्याम नवले व संदीप माळी यांचा खा.श्री.छ. उदयनराजे यांचे हस्ते विशेष...

कलाशिक्षक घनःश्याम नवले व संदीप माळी यांचा खा.श्री.छ. उदयनराजे यांचे हस्ते विशेष सत्कार

साताराः येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक घनःश्याम नवले व संदीप माळी यांचा नुकताच संपन्न झालेल्या 44 व्या जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनाचे वेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांचे हस्ते या दोन्ही शिक्षकांना विशेष स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी जि.प.चे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, संस्थेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी, उपशालाप्रमुख डी.एस.कांबळे यंाची प्रमुख उपस्थिती होती.
न्यू इंग्लिश स्कूलच्या साजर्‍या होणार्‍या विविध सांस्कृतिक उपक्रमात या दोन्ही कलाशिक्षकांचे विशेष योगदान असते. त्यामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव, टाकावू वस्तूपासून बनविलेल्या आकर्षक कलाकृती, आषाढी एकादशी, पर्यावरणपुरक नागपंचमी, राज्यातील शिक्षण सुधारक समाजसेवक यांच्या साजर्‍या होणार्‍या जयंतीदिनी हे दोन्ही शिक्षक अग्रक्रमाने पेन्सिल स्केचेस काढून पर्यावरणपुरक हे उत्सव साजरे करतात. नुकत्याच संपन्न झालेल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात या दोघांनी रेखाटलेली विविधरंगी कथ्थककली नृत्य कलाकाराची प्रतिमा विशेष लक्षवेधक ठरली होती.
केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, जिल्हयाचे लाडके खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचेसह जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य वसंतराव जोशी,सुप्रसिध्द अभिनेत्री श्रृती अत्रे यंाचेसह क्रिडा मेळाव्यास हजर असलेले उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सुप्रसिध्द मल्लखांब पट्टू सुजित शेडगे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पटू प्राची वेलणकर थत्ते आदींची पेन्सिल स्केचेस विशेष लोकप्रिय ठरली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनीही कलाशिक्षकांच्या या कलेला दाद देत त्यंाचा सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार केला. याप्रसंगी जि.प.शिक्षण सभापती राजेश पवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. घनःश्याम नवले व संदीप माळी यांच्या अजोड कलाकृतीतून न्यू इंग्लिश स्कूलच्या भव्य सभागृहात साकारलेले कलादालन आपण सर्व जिल्हावासियांनी एकवार भेट देवून पाहिलेच पाहिजे व या कलाकृतींना भरभरून दाद दिलीच पाहिजे असे हे त्यांचे काम खरोखरच कौतूकास पात्र ठरणारे आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular