Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीप्राचार्य केळकर, जयश्री घुले, मधुकर खरे, महेंद्र बाजारे, डॉ. दादासाहेब चौगुले यांना...

प्राचार्य केळकर, जयश्री घुले, मधुकर खरे, महेंद्र बाजारे, डॉ. दादासाहेब चौगुले यांना गुंफण पुरस्कार जाहीर

साताराः मसूर, जि. सातारा येथील साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या गुंफण अकादमीच्या वतीने गुंफण साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सद्भावना व पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारांच्या मानकर्‍यांमध्ये प्राचार्य रामदास केळकर, महेंद्र बाजारे, डॉ. दादासाहेब चौगुले, जयश्री घुले व मधुकर खरे यांचा समावेश असल्याची माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे व उपाध्यक्ष बबन पोतदार यांनी दिली. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व बुके असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
गुंफण साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेले रामदास केळकर हे गोव्यातील मांद्रे (पेडणे) येथील सप्तेश्‍वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य असून त्यांची ऑलिम्पिक, करियर मित्र, संस्कार कुपी, करियरवर बोलू काही, परिचयातले करियर, अक्षरमित्र, संधी गोव्यातल्या, अक्षरनामा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विपूल लेखन केले आहे. तसेच विविध शाळा महाविद्यालयातून करियरविषयक मार्गदर्शन केले आहे. गुंफण सामाजिक पुरस्कारासाठी निवड झालेले महेंद्र बाजारे हे महुद ब्रुद्रुक (जि. सोलापूर) येथील असून त्यांनी महुद बुद्रुक येथील त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत सुधारणा करुन माळरानावर डाळींब व बोराच्या बागा फुलविल्या. शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. रक्तदान व आरोग्य शिबिरे, समाजप्रबोधन कार्यात त्यांनी आजवर हिरीरीने सहभाग घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीत आपल्या गावाच्या मध्यभागी स्वखर्चाने कूपनलिका काढून त्यांनी गावासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले.
गुंफण सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. दादासाहेब सिध्दाप्पा चौगुले हे बेळगावच्या भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये कन्नड विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी मकन्नड – मराठी आधुनिक रंगभूमी तौलनिक अध्ययनफ या विषयावर धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून पीएचडी संपादन केली आहे. ते उत्तम नाटककार, लघुकथा लेखक व चित्रकार आहेत. त्यांची पंधराहून अधिक नाटके कन्नडमधून प्रकाशित झाली असून त्यांनी दोन मराठी भाषेतील पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी मराठी भाषेत दोन पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्यांच्या चित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. त्यांना कर्नाटक नाटक अकादमी, कर्नाटक अनुवाद साहित्य अकादमी, कर्नाटक विद्यावर्धक संघ, धारवाड यांच्याकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी व कन्नड अनुवादामुळे ते खर्‍या अर्थाने सांस्कृतिक दूत ठरले आहेत.
गुंफण सद्भावना पुरस्कारासाठी निवड झालेल्या श्रीमती जयश्री घुले या पुणे येथील असून त्यांची रजनीगंधा हा काव्यसंठाह व सुखदा हा कथासंठाह ही दोन पुस्तके प्रसिध्द आहेत.
त्यांच्या कवितांचे आकाशवाणीवरुन सादरीकरण झाले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी परिक्षक म्हणून व कवीसंमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून समाजात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे काम केले आहे. गुुंफण पत्रकारिता पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील पत्रकार मधुकर खरे यांची निवड करण्यात आली आहे. ते गेली वीस वर्षाहून अधिक काळ निर्भिडपणे पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी आजवर आपल्या निर्भिड लेखणीने समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडली आहे.
त्यांना यापूर्वी मुंबई पत्रकार संघाचा निर्भिड पत्रकार पुरस्कार, आर. आर. आबा प्रतिष्ठानचा राजयस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रविवार दि. 10 फेब्रुवारी रोजी कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे संपन्न होणार्‍या 16 गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular