Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीगोव्यातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बसवेश्वर चेणगे

गोव्यातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बसवेश्वर चेणगे

साताराः गोव्यातील ताळगाव येथील माधव राघव प्रकाशनच्या पुढाकाराने रविवार दि. 12 मे रोजी मिरामार (पणजी) येथे होणाछया साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मसूर (जि. सातारा) येथील गुंफणअकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी मिरामार येथील यूथ हॉस्टेलमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आले असून सकाळी 10 वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. पत्रकार व वक्ते प्रभाकर ढगे हे संमेलनाचे उद्घाटक आहेत. यावेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाछया कार्यकत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी 2.30 वाजता प्रा. नीता तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे हे पत्रकार, साहित्यिक, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. गुंफण दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यासह इतर राज्यांतील मराठी भाषकांचे साहित्य प्रसिद्ध होत असते. गुंफण अकादमीतर्फे मराठी भाषा, साहित्याच्या जतन, संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. गेल्या सोळा वर्षांपासून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात सुध्दा साहित्य संमेलन घेण्यात येते. या संमेलनात साहित्य पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येतो. विनोदी कथास्पर्धा घेण्यात येते. उद्घाटक प्रभाकर ढगे हे गोव्यातील पत्रकार व साहित्यिक आहेत.
गोव्यातील विविध दैनिकांत त्यांनी प्रमुख पदावर काम केले आहे. ते कथाकार असून त्यांचा कथासंग्रहही प्रकाशित झालेला आहे. ते उत्तम वक्ते असून विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते सध्या एक नियतकालिकही चालवतात. कविसंमेलनाच्या अध्यक्ष प्रा. नीता तोरणे या कवयित्री असून पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करतात. मराठी साहित्याविषयी प्रेम असलेले विद्यार्थी त्या घडवीत आहेत. त्यांच्या कविता मराठीबरोबरच कोंकणी, इंग्रजी व कन्नड भाषेत भाषांतरित झाल्या आहेत. मएक ओळ कवितेचीफ आणि पुन्हा एकदा हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या काव्यसंध्येचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular