Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमुख्यमंत्र्यांकडून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी ; भाजप कार्यकत्यांकडून साखर वाटून आनंद...

मुख्यमंत्र्यांकडून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी ; भाजप कार्यकत्यांकडून साखर वाटून आनंद व्यक्त

सातारा : तब्बल साडेतीनशे दिवसानंतर सातार्‍याच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मार्गी लावला. कृष्णा खोरे विकास महामंडळाची कृष्णानगर येथील पंचवीस एकर जागा कॉलेजसाठी देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दैनिक ग्रामोध्दारने मेडिकल कॉलेज संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. फडणवीस शासनाने सातार्‍यासाठी मेडिकल कॉलेज देउन सातारकरांना दिलेला शब्द खरा केला. उदयनराजे यांच्या वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांनी सैनिक स्कूलच्या मैदानावर मेडिकल कॉलेज देण्याची घोषणा केली होती. अवध्या 97 दिवसात मंत्रालयाकडून महत्वाच्या पंचवीस एकर जागा जिल्हाधिकार्‍यांना हस्तांतरित करण्याचे आदेश पारित झाले आहेत.  
सातारा जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र, ते कोठे उभारायचे, यावरून अक्षरश: कॉलेजच सलाइनवर ठेवले गेले. गत राज्य सरकारच्या काळात जिल्ह्यातील मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री असतानाही मेडिकल कॉलेजसाठी जागा देताना अक्षरश: ख्योळ सुरू ठेवला गेला. सात वर्षे लोटली तरी सातारकरांच्या आरोग्यासाठी ममाइलस्टोनफ ठरू पाहणार्‍या या कॉलेजला जागा देण्याचा निर्णय झाला नाही. विद्यमान सरकारच्या काळातही त्याला गती मिळत नव्हती. प्रभात ने या कळीच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. व सर्वपक्षीय आंदोलनाचे आश्वासन सर्वच पक्षांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे  दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 18 मे 2017 रोजी महिनाभरात मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न सोडविणार, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्यावर वेगाने पावले उचलली गेली नाहीत. यादरम्यान ता. 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सातारा दौर्‍यावर आले असता म प्रभात मने पुन्हा एकदा तीव्रपणे लोकभावना मांडल्या.
शिवाय, प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न पुन्हा एकदा मांडला. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लवकरच त्यास मान्यता देऊ, अशी ग्वाही दिली.
अखेरीस मेडिकल कॉलेजला जागा देण्याचा दिवस आज उजाडला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयास 25 एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. यामुळे गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी माइलस्टोन ठरणारे मेडिकल कॉलेज लवकरच उभारले जाईल, अशी सातारकरांची अपेक्षा निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ?.
* सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एकर जागा कायमस्वरूपी
* महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा
* गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार
* गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही चांगल्या संधी
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular