Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता.... ; देसाई गटाचा धुव्वा...

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता…. ; देसाई गटाचा धुव्वा…

पाटण:- ( शंकर मोहिते )- पाटण तालुक्यात झालेल्या ६ सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने ४ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम ठेवत देसाई गटाच्या ताब्यात असलेल्या खराडवाडी, नाणेगाव ब्रु. या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. पाटण तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक निकाला वेळी येरफळे, लुगडेवाडी, मेंढ, खराडवाडी, नाणेगाव ब्रु. येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उदळण करुन विजय उत्सव साजरा केला.
पाटण तालुक्यात या निवडणूक टप्प्यात एकूण सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी नहिंबे-चिरंबे येथे ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली. यात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाच्या सौ. स्नेहल सुनिल साळवी यांची सरपंचपदी निवड झाली होती. तर चंद्रकांत दादासाहेब साळवी, शैलेश शंकर कदम, सुशिला बाळकृष्ण जाधव, सौ. बबित जयवंत साळुंखे, सौ. योगिता यादवसाळुंखे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. ही ग्रामपंचायत यापूर्वीही पाटणकर गटाकडेच होती. यावेळीही ती पाटणकर गटाकडे अबाधित ठेवण्यात पाटणकर गटाला यश आले.
प्रत्यक्ष निवडणूक झाली त्यापैकी येरफळे, लुगडेवाडी, मेंढ येथे पाटणकर गटाची यापूर्वी सत्ता होती ती अबाधित ठेवत आ. देसाई गटाच्या ताब्यातील चाफळ विभागातील खराडवाडी, नाणेगाव बुद्रूक या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत येथे पाटणकर गटाने पाचही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवत आपली सत्ता प्रस्थापित केली.
येरफळे गावच्या सरपंचपदी सौ. सुनिता अनिल भिसे तर सदस्यपदी जालिंदर दिनकर भिसे, शंकर गणपतराव पाटील, अमर श्रीरंग निकम, जयश्री उदय पडवळ, जयश्री प्रकाश पडवळ, शोभा अरविंद पडवळ, पंढरीनाथ यशवंत पाटील, बबीता कृष्णत पवार, मोनाली सावळा गुरव यांची वर्णी लागली. लुगडेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता धनाजी लुगडे, सदस्यपदी मंगल भागवत गावडे, रमेश तुकाराम लुगडे, जयश्री यशवंत लुगडे, अपेक्षा महेंद्र लुगडे, भागवत निवृत्ती लुगडे यांची वर्णी लागली. येथे दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
नाणेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीवर सरपंचपदी विक्रम अधिक पवार, सदस्यपदी भारती शरद पाटील, वैभव उत्तम मुळगावकर, वर्षा अशोक लोहार, विक्रम अधिक कुंभार, संगीता अमृत पाटील, रेश्मा संतोष पवार, रामचंद्र जगन्नाथ पवार यांची वर्णी लागली. खराडवाडी गावच्या सरपंचपदी सौ. शोभाताई सुरेश कुंभार, जयश्री लक्ष्मण खराडे, लक्ष्मण यादवराव खराडे, मंगल शिवाजी खराडे, बापूराव व्यंकट खराडे, चंद्रभागा संपत खराडे, मोहन गणपती लोहार, शांताबाई ज्योती कुंभार यांची वर्णी लागली.
मेंढ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमित शंकर पाटील, सदस्यपदी रंजना रमेश पाटील, वंदना लक्ष्मण पाटील, आत्माराम साधू पाटील, विलास आनंदा जाधव, उषाताई गणेश जाधव यांची वर्णी लागली. येथे दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. या निवडणुकांसाठी तहसीलदार रामहरी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी वाघमारे, गाडे, साळुंखे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular