सातारा (एकनाथ थोरात ): सातारा शहरातील पोवईनाका येथे 60 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात येणार्या ग्रेड सेप्रेटरच्या कामाने आता वेग घेतला आहे. दरम्यान, पोवईनाका रहिमतपूर रोडला बढीया पेट्रोलपंप मार्गे वाहतुक वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची संरक्षक भिंत पाडून कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग पाडण्याचे काम वेगाने सुरु आहे. सातारा शहरात ग्रेड सेप्रेटरचे काम तहसिलदार कार्यालय ते पोवईनाका व पोवईनाका ते आयडीबीआय बँके पर्यंत पूर्ण झाले आहे. मराठा रेडीओ ते बगाडे हॉस्पीटल या रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे.
पोष्ट कार्यालय, बीएसएनएल सह काही महत्वाची कार्यालये पोवईनाक्यावर आहेत. या ठिकाणी नागरिकांना ये जा करण्यासाठी पंचायतसमिती, फोडजाई मंदिर मार्गे वाहतुक सुरु आहे. सध्या पोवईनाक्यावरील कोरेगाव रोडचे काम 50 टक्के झाले आहे. सध्या पोवईनाक्यावरुन कराडकडे जाणार्या मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पीडब्ल्युडीची संरक्षक भिंत व काही इमारती पाडण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे वाहतुक वळविण्यात आली आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्यामुळे रस्ता ओलांडताना शाळेचे विद्यार्थी, पालक यांची दमछाक होताना दिसत आहे. पोवईनाका रहिमतपूर मार्गे ग्रेड सेप्रेटरचे काम करताना रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. यामुळे सध्या सातार्यातील बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षासाठी जादा पैेसे मोजून जावे लागत आहे.
शहरात येणार्या बस वाडेफाटा मार्गे व बॉम्बे रेस्टॉरंटकडून जिल्हा परिषद मार्गे बसस्थानकाकडे जात असल्याने प्रवाशांना जादा पैसे व पायपीट करावी लागत आहे.
रस्त्याच्या कामामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढले असून धुळ वाढू नये यासाठी पाण्याची फवारणी केली जात आहे. एकूणच सातार्यात पोवईनाक्यावर ग्रेड सेप्रेटरच्या कामाने आता वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
पोवई नाक्यावरील ग्रेड सेप्रेटरच्या कामाने घेतला वेग
RELATED ARTICLES