सातारा :- सातारा येथील जीएसटी कर सल्लागार मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यामध्ये चैतन्य सडेकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विनय नागर यांची आणि सेक्रेटरी पदावर चार्टर्ड अकाउंटंट मेहुल मेहता यांची निवड झाली. खजिनदार म्हणून संग्राम खामकर हे काम पाहणार आहेत .या सर्व निवडी एकमताने झाल्या असून यावेळी जेष्ठ करसल्लागार ॲड. विनायकराव आगाशे यांच्या हस्ते या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. विनायकराव आगाशे म्हणाले की ,नूतन जीएसटी कर प्रणालीत नवनवीन बदल होत आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या अभ्यासू वृत्तीतून हे कर भरणाऱ्या सर्व करदात्यांना बहुतेक अनाकलनिय असतात.कर दात्याना कर भरताना जीएसटी सल्लागार मंडळाची मोठी मदत व मार्गदर्शन मिळणार आहे .नवे पदाधिकारी जे पदावर निवडले गेले आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा चिंततो .या कार्यक्रमात संजय मेहता, सी. वाय. कुलकर्णी ,श्री कथले आदी मान्यवर कर सल्लागार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.