परळी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुडीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, यासाठी सातारा शहरात व उपनगरांत बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारण्यासाठी साखरेचे हार, कंगन तसेच तांब्याच्या व चांदीच्या कलशांनी बाजारपेठ सजली आहे. यासोबतच पाडव्याचा मुहूर्त साधून अनेकजण घर, मोबाईल,सोने,वाहन किंवा इतर वस्तू खरेदी करतात. यासाठी विविध शोरूम सजली असून, वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तांब्यांचे व चांदीचे कलश बाजारपेठत दाखल गुढीला शोभा येते ती मंगल कलशामुळे, तांब्याचा मंगल कलश गुढीला बांधला जातो. चांदीचे
प्लेटिंग केलेले व चांदीचे गडू बाजारपेठेत आले आहेत.तांब्यांच्या कलशाचे पूजेसाठी महत्त्व असल्याने नागरिकांची पसंती असल्याचे दिसून येते.तांब्याचे कलश 100 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढी उभारण्यासाठी ब्लाउज पीस,साड़ी अशी वस्त्रे वापरली जात असल्याने भरजरी आणि जरीकाठ असलेल्या साड्याही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने ग्राहका खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. पाडव्याचा मुहूर्ताला इलेक्ट्रनिक वस्तू, मोबाईल,
सोन्याचे दागिने, बाईक व कारच्या शोरूम सजल्या आहेत.गुढीपाडव्यालाच कार किंवा बाईक घेता यावी यासाठी नागरिकांनी एक -दोन आठवडे आधीपासूनच बुकिंग करून ठेवले असून, काही जण याच दिवशी खरेदीला पसंती देण्याची शक्यता असल्याने शोरूम मालक देखील सज्ज झाले आहेत. विविध कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूवर, मोबाईलवर
काहीना काही ना ऑफर देण्यात येत असून यात काही भेटवस्तू किंवा लकी ड्रॉ अशा ऑफरचा समावेश आहे.बाजारपेठेत अनेक ठिकाणी साखरेच्या माळा विक्रीस आल्या आहेत. त्यात साधी माळ व चंपाकळी असे दोन प्रकार असतात. साधारण 10 ते 100
रुपयांपर्यंत या साखर माळांचे दर आहेत. नारळांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली असून येत्या दोन दिवसांत याची मागणी वाढेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
गढीपाडव्यासाठी सातारा जिल्ह्यातील बाजारपेठा सज्ज
RELATED ARTICLES