Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीशिवाजी विद्यापीठात गुणपत्रिका एका विषयाची, प्रमाणपत्र दुसर्‍या विषयाचे

शिवाजी विद्यापीठात गुणपत्रिका एका विषयाची, प्रमाणपत्र दुसर्‍या विषयाचे

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाशी संलग्न तीन ते चार हजार महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देण्याचे काम विद्यापीठामार्फत केले जाते. परंतू फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात मार्च 2016 रोजी एम.ए. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला हिंदी विषयाची गुणपत्रिका, तर इंग्रजी विषयाचे प्रमाणपत्र देवून इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था केली आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत कुलगुरुंनी चौकशी करावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये शिकत असलेला विद्यार्थ्याने बी.ए. पास झाल्यानंतर एम ए सी बी सी एस (हिंदी) विषय घेऊन परिक्षा दिली. या परिक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला 1600 पैकी 1112 गुण मिळाले. त्यानंतर त्याने महाविद्यालयाकडे गुणपत्रिका मागितली. ही गुणपत्रिका त्याला तीन महिन्यानंतर हातात मिळाली. संबंधित विद्यार्थ्याने एम. ए. पास झाल्याचे प्रमाणपत्र विद्यापीठाकडून मागितले. परंतू त्याला वेळेत प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यासाठी त्याने वारंवार छ. शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर विद्यापीठाने त्याला प्रमाणपत्र दिले. हे प्रमाणपत्र हिंदी विषयासाठी असणे अपेक्षित होते. परंतू इंग्रजी विषयाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे हा विद्यार्थी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराने चक्रावून गेला आहे. या विद्यार्थ्याचा परिक्षा आसन क्र. 902661 असून फलटण याठिकाणी त्याने परिक्षा दिली होती. तब्बल तीन वर्षाने ही बाब उघड होवूनसुद्धा याबाबत शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही खंत व्यक्त केली नाही, तसेच याबाबत संबंधित विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रात दुरुस्तीही केली नाही. अशा अनेक गंभीर तक्रारींची विद्यापीठात दखल घेत जात नसल्याचे किस्से पालक ऐकून होते. आतातर गुणपत्रिका वेगळी, प्रमाणपत्र वेगळे असे घडल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा चुका आढळल्यास अशा विद्यार्थ्यांनी तक्रारअर्ज करुन त्याची एक प्रत लोकजनशक्ती पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड, उपाध्यक्ष यशवंत मतकर, तालुकाध्यक्ष हेमंत भोईटे यांच्याकडे दिल्यास विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दाद मागता येईल, असे स्पष्ट केले आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular