वाई : वाई तालुक्यातील हळद पिकांचे आगार समजले जाणार्या ओझर्डे परिसरात सध्या हळद काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकर्यांची हळद या नगदी पिकांचे काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करुन प्रत्यक्ष कामासही सुरुवात
वाई तालुक्यातील हळद पिकांचे आगार समजले जाणार्या ओझर्डे परिसरात सध्या हळद काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकर्यांची हळद या नगदी पिकांचे काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करुन प्रत्यक्ष कामासही सुरुवात
वाई तालुक्यातील हळद पिकांचे आगार समजले जाणार्या ओझर्डे परिसरात सध्या हळद काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकर्यांची हळद या नगदी पिकांचे काढणीसाठी मजुरांची जुळवाजुळव करुन प्रत्यक्ष कामासही सुरुवात केली आहे. दरम्यान, मजुरांजा तुटवडा असल्याने हळद काढणीचा हंगाम अधिक काळ चालणार असून मजुरांचे भावही वधारले असल्याने शेतकर्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार हे मात्र निश्चित.
वाई तालुक्यातील ओझर्डे परिसरातील गावांमधील शेतकरी हे पिढ्यान्पिढ्या स्पर्धात्मक हळद या जातीचे पिक लाखो रुपये खर्च करून घेतात. हळदीस किती भाव मिळेल याची पर्वा न करता शेतकरी शेकडो एकराची लागण करतात. आपले हळदीचे पीक कसे चांगले येईल यासाठी हजारो रुपयांचे शेण खत आणुन जमिनीवर ओतले जाते व इतर रासायनिक खते वापरली जाऊन आपले पिक इतर शेतकर्यांपेक्षा कसे चांगले येईल यासाठी शेतकरी वर्गाचा अधिक प्रयत्न असतो.
यासाठी गावच्या विकास सेवा सोसायटीचे, बँकेचे आणि इतर ठिकाणाहूनही कर्ज काढून वर्ष भर पिकाला मुलांप्रमाणे जपत असतो. लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असतानादेखील जानेवारी महिन्यात हळद काढणीसाठी पुन्हा हळद व्यापार्याकडुन पिकांच्या काढणीसाठी हजारो रुपये आणून काढणीला सुरुवात करून ती शिजवून वाळवून, मशिनच्या सहाय्याने स्वच्छ करुन पोत्यात भरुन ति विक्रीसाठी बाजार समितीचे काट्यावर शेतकरी पोहोचतो. आता मला लाखो रुपये मिळणार, येणार्या पैशातून मी कर्ज मुक्त होणार अशी आशा बाळगतो, पण तेथील व्यापार्यांच्या टोळीने प्रती क्विंटलला काढलेला दर ऐकूण शेतकर्यांवर हताश होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाने हमीभाव ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाई तालुक्यातील हळद काढण्याच्या कामाला सुरुवात
RELATED ARTICLES