म्हासुर्णे ः म्हासुर्णे ता.खटाव.येथील हरणाई अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी म्हासुर्णे शाखेचा 16 वा वर्धापन दिन शाखेच्या ठिकाणी दिनांक 05-04-2019 रोजी सकाळी 11 वाजता साजरा झाला.हरणाई अर्बन को-ऑफ- क्रेडिट सोसायटी संस्थापक -चेअरमन भिमराव घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस श्रीराम विद्यालयाचे चेअरमन महादेव माने,लालासो गायकवाड ,पंंढरीनाथ माने,शशीकांत डोळ,सुभाष कोकाटे,युवा नेते प्रदीप माने,सचिन शिंदे,ग्रा,प.सदस्य तुषार माने,बबन स्वामी,विनायक औंधे,शांताराम कुलकर्णी ,अशोक सरकारी ,आण्णासो माने,विठ्ठल माने, या मान्यवंराच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी भाषणामध्ये सर्वानी संस्थेचे तोंड भरुन कौतुक केले संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन भिमराव घोडके बोलताना म्हणाले की, हि शाखा सुरू झाली पंधाराव्या वर्षात दुष्काळात मात करुन ही हि संस्था अजही आपला चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहे.अनेक परिस्थिती वर मात करुन संस्था यशस्वी वाटचाल करत आहे.तसेच गावातील युवकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल ती मदत केली जाईल तरी युवकांनी या व्यवसायात यावे.या संस्थेने 1हजार ते 40 लाखापर्यत कर्जे वाटप केले आहेत.यापुढे शेतकर्यांनी शेती बरोबर जोडधंदा सुरू करुन आपली प्रगती करावी. यावेळी या कार्यक्रमास भिमराव माने, शंकर माने,सुभाष कोकाटे,चंद्रकांत माने,विलास माने,नामदेव माने,बबन स्वामी,आनंदकुमार औंधै, शेनवडी गावातील बबन माडके,डॉ.रत्नपारखी,पंढरीनाथ यमगर,संजय घोडके,पंढरीनाय यमगर,डॉ.नष्ठे,सचिव विजय घोडके,व्वस्थापक राजेंद्र पवार शाखाधिकारी मारती घार्गे,उत्तर भादिर्गे सौ पुनम माने उपस्थित होते.
गावातील ग्रामस्थ व संस्थेचे सभासद उपस्थित होते,कार्यक्रमावेळी संस्थेच्या वतीने सुरूवातीस सचिव विजय घोडके यांनी सर्वाचे स्वागत केले.सर यांनी संस्थेच्या वतीने उपस्थिताचे आभार मानले.
हरणाई अर्बन को-ऑप-क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन संपन्न
RELATED ARTICLES