Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकृष्णा कारखान्यावर 290 जणांची आरोग्य तपासणी

कृष्णा कारखान्यावर 290 जणांची आरोग्य तपासणी

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना, सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने माता-बालक, ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 290 जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील यांच्या हस्ते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, जि.प.सदस्या शामबाला घोडके, व्हा.चेअरमन जगदीश जगताप, माजी प.स.सदस्य सुनिल पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आरोग्याबाबत प्रबोधनासाठी आरोग्य शिबीरे वारंवार राबविण्यात यावीत. शिबीरांमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत असतेे. रेठरे बुद्रुक या ठिकाणी मुंबई, पुणे सारखी आरोग्यसेवा उपल्बध करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची डॉ. सुरेश भोसले यांनी ग्वाही दिली. शिबीराची सुरवात धन्वंतरी व स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
संचालक धोंडीराम जाधव, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल कोरबू, विक्रमसिंह मोहिते, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, सेक्रेटरी मुकेश पवार, लेबर अ‍ॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सॅनिटेरी ऑफिसर विजय पवार प्रमुख उपस्थीती होती.
प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक वैद्यकिय अधिकारी डॉ. मैथीली मिरजे, डॉ.अनिता कदम, कृष्णा हॉस्पीटल वैद्यकिय पथक, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षल निकम यांचे या शिबीरास सहकार्य लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular