मेढा ( वार्ताहर ) :- जावळी तालुक्यातील मौजे आलेवाडी येथील सध्या मुबंई येथील उद्योजक हणमंत पवार यांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हेल्थ प्लस मेडिकल्स कडून जावली तालुक्यातील कोविड रूग्णासाठी उपयुक्त असणारे अंदाजे साडे तीन लाखांचे आवश्यक मेडिसिन्स उपलब्ध करुन दिली आहेत.
सध्या मुबंईत कार्यरत असले पवार यांनी आपल्या नागरिकांसाठी आपली कर्तव्यभावना जपली असून याचे आलेवाडी जनतेतून कौतुक होत आहे.पवार यांच्या कुटुंबियांकडुन नुकतीच हे मेडिसिन जावलीचे गटविकास अधिकारी सतिशजी बुध्दे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पांडुरंग (बापू) जवळ, नगरसेवक विकास देशपांडे, सुनिल शिंदे, संपतशेठ शिंदे, रवि शिंदे, संजय जवळ आदी मान्यवर उपस्थित होते. गटविकासअधिकारी सतिश बुध्दे सर यांनी पवार कुटूंबियांतील शिल्पा पवार,जितेश पवार,शैलेश वंश,राहुल तिवारी,निलेश पवार,हेल्थप्लस मेडिकल ग्रुप प्रभादेवी मुंबई चे सदस्य दत्ता बांदल यांनी दिलेल्या या मेडिसिनबाबतच्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले.