Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजवळवाडी येथील गोपाळ समाजाला मदत ; विजय सावले यांचे कार्य गौरवास्पद.

जवळवाडी येथील गोपाळ समाजाला मदत ; विजय सावले यांचे कार्य गौरवास्पद.

मेढा:-  जवळवाडी ता. जावली येथे गोपाळ समाजाची अनेक कुटुंबे रहात असून या कुटुंबांचे गतवर्षी कोरोना काळापासून प्रचंड हाल सुरु आहेत. सातारा जिल्हयामधे वाढलेल्या लॉकडावूनमुळे तर या वसाहतीमधील अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंची किट सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री विजय सावले यांनी दिली आहेत त्यांचे हे कार्य अभिमानास्पद असल्याचे गौरवास्पद उदगार जावलीचे तहसिलदार श्री राजेंद्र पोळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
जवळवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात गोपाळ समाजाची वसाहत असून गेली अनेक वर्षे काबाडकष्ट, मोलमजुरी व बॅन्ड वादन करून येथिल लोकांचा उदरनिर्वाह चालतो. पण गतवर्षापासून त्यांचे हातच थांबले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ऊपासमारीची वेळ आली आहे. या लोकांना मदत मिळावी यासाठी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंंच सौ वर्षा विलास जवळ यांनी उद्योजक श्री विजय सावले यांना या समाजाची परस्थिती सांगितल्यावर त्यांनी तात्काळ मदत पोहच करीत असल्याचे सांगितले.
सावले यांनी दिलेली मदत या समाजाला वाटण्यात आली. या समाजाला कोरोना काळात केलेली मदत प्रेरणादायी असून गरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी समाजातील दानशुर लोकांनी पुढे येण्याचे आवाहन या वेळी जावलीचे तहसिलदार श्री राजेंद्र पोळ,गट विकास अधिकारी श्री सतिष बुध्दे, स.पो.नि.श्री अमोल माने यांनी केले आहे. या प्रसंगी सरपंच सौ वर्षा जवळ, भामघरचे पोलिस पाटील श्री ज्ञानेश्वर सावंत,ग्रामसेवक श्री वैभव निकम, श्री शंकरराव जवळ,श्री अरूण जवळ हे उपस्थित होते. या समाजाच्या वतीने श्री शामराव चव्हाण व श्री राजेंद्र पवार यांनी आभार मानले आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular