Saturday, June 21, 2025
Homeसातारा जिल्हापाटणअडकुन पडलेल्या मजुर कुटुंबियांना आधार संस्थेने दिला मदतीचा हात.

अडकुन पडलेल्या मजुर कुटुंबियांना आधार संस्थेने दिला मदतीचा हात.

पाटण:- कोरोना विषाणु विरुध्दच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा आहोरात्र काम करीत आहेत. डोळ्यांनी न दिसणाऱ्या या शत्रूमुळे संपूर्ण जग हादरुन गेले आहे. स्वयंसेवी व सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानुन स्वार्थाविना सेवाभाव या ब्रीदाला अनुसरून काम करणाऱ्या पाटण येथील आधार संस्थेने सोशल डिस्टिंगशन चे पालन करीत पाटण शहरालगत असणाऱ्या अनेक कुटुंबियांना १५ दिवस पुरेल एवढा किराणा देऊन लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या अनेक मजुरांना मदतीचा हात देऊन दिलासा दिला .

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या पाटण येथील आधार जनसेवा सामाजिक संस्थेने नेहमीच गरजुंना मदतीचा हात देऊन समाजाप्रती आपल्या संवेदना नेहमीच जागृत ठेवल्या. संस्थेने शिरळ येथे विजापुरहून रस्त्याच्या कामासाठी आलेल्या ६ कुटुंबातील १५ व्यक्ती, मेष्टेवाडी येथील एका कुटूंबातील ५ व्यक्ती, घाणबी येथील एका कुटुंबातील २ व्यक्ती, रोमणवाडी (येराड) येथील ४ कुटुंबे एवढया लोकांना जाग्यावरती जाऊन मदत दिली. तसेच हातावरचे पोट असणाऱ्या खंडाळा येथुन आलेल्या पांडु चव्हाण यांचे मेष्टेवाडीच्या माळावर पाल आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या वळीव पावसाने त्यांच्या पालावरील ताडपत्रीचे नुकसान झाले. संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले. हे समजताच संस्थेने किराणा वस्तुबरोबर छताचीही व्यवस्था केली.

संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते, अँड प्रकाश गायकवाड, सुनिल क्षिरसागर, सुरेश चव्हाण, सोमनाथ आग्रे यांनी एकत्र न येता औनलाईन संपर्क साधुन मदत कार्याला सुरूवात केली. तर आधारचे कार्यकर्ते स्वप्निल नेवरेकर ,मनिष घोणे यांनी किराणा मदत गोळा करुन गरजुंपर्यंत पोहच केली. या उपक्रमासाठी संस्थेच्या आवाहानाला प्रतिसाद देत सुरेश चव्हाण, अँड कमलेश लिमये, सत्यजीत खुटाळे, प्रसाद वळसंग, सुशांत गुरव, सोमनाथ आग्रे, स्वप्निल कुंभार, युगंधर शेडगे, द्विग्वीजय शिंदे, योगेश चौधरी यांनी मदतीचा हात दिला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular