Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीकिसन वीरचे सहकार्य विसरणार नाही: हिंदुराव घोरपडे

किसन वीरचे सहकार्य विसरणार नाही: हिंदुराव घोरपडे

भुईंज : हासेवाडी कोरेगांव तालुक्यातील छोटे गाव, गेल्या दोन वर्षापासुन आम्ही दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहोत. सध्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. हासेवाडी गावामध्ये किसन वीर कारखान्याची सभासद संख्या कमी परंतु अशा कठीण परिस्थितीत हासेवाडी गावची गरज ओळखुन किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारखान्याच्या माध्यमातुन जलसंधारण कामांसाठी आम्हांला डोंगराएवढी मदत केली. हासेवाडी गावाला केलेले सहकार्य आम्ही कदापी विसणार नाही, असे प्रतिपादन हासेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन हिंदुराव घोरपडे यांनी केले.
हासेवाडी ता. कोरेगांव येथील जादवा शेत येथील ओढा खोलीकरण व रूंदीकरण व इतर जलसंधारण कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्‍या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, विजय चव्हाण, हासेवाडीचे सरपंच विकास घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याचे संचालक सचिन सांळुखे यांनी आपल्या मनोगतामध्ये दुष्काळाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आणि जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी मदनदादांनी कार्यक्षेत्रातील गावांना सहकार्य करण्याची भुमिका घेतलेली आहे. गावचा दुष्काळ हटविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विजय चव्हाण आणि सरपंच विकास घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी निलकंठ घोरपडे , वामन घोरपडे, आबासोा घोरपडे, समाधान घोरपडे, अक्षय घोरपडे, दिपक घोरपडे, दिंगबर घोरपडे, संकेत घोरपडे, महादेव घोरपडे, संकेत घोरपडे, बाळासो घोरपडे, वैभव घोरपडे, समाधान घोरपडे, विकास घोरपडे, नवनाथ घोरपडे, श्रीरंग घोरपडे, अजित खताळ, दत्तात्रय खताळ, तुकाराम खताळ, दाजीराम खताळ, सागर साळुंखे, नारायण तांबे, पुजा शेलार यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular