सातारा दि. 15 (जि.मा.का.) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले ,त्यांचे स्मरण व्हावे त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेवून समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी यासाठी हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळ आहेत. इथे नतमस्तक होवून पिढ्यांनी इथ हुताम्यांचे आत्मचरित्र वाचावीत यासाठी इथे वाचनासाठी पुस्तक उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या केली.
सातारा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित हुतात्मा स्मारक नुतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ.शंभुराजे देसाई , जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे , जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, मानसिंगराव शिंदे , पतंगराव फाळके , नगरसेवक , स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा जसा केळीचा , नागपूर जसा संत्र्याचा तसा सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे बिरुद खुप अभिमानास्पद असच असून या जिल्ह्यातील शेकडो सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढले. ते आमची कायमची प्रेरणा आहेत म्हणून आम्ही जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकाना निधी देवून त्याचे नुतनीकरण करुन त्यात वाचनालय , संरक्षक भिंती, गार्डन ही कामी केली आहेत. या स्मारकांमध्ये विविध हुतात्म्याचे चरित्र , त्यांच्या शौर्य कथा असलेले साहित्य ठेवले जाईल. यातून युवकांना नवी प्रेरणा मिळण्यास उपयोग होइल. ही भूमी छत्रपतींची आहे , प्रती सरकार स्थापन करणाऱ्या नाना पाटलांची आहे , महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आहे त्यामुळे फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारे काम या भूमितून झाले असल्याचे गौरवोद्गार शिवतारे यांनी यावेळी काढले.
या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री मानसिंग पवार, पतंगराव फाळके , सोपानराव घोरपडे , कै. सखाराम किरदर यांचे चिरंजीव तुकाराम किरदर , कै. अण्णासाहेब शेट्टे यांचे चिरंजीव महेश शेट्टे ,कै. गुलाबराव फडतरे यांचे चिरंजीव गंगाधर फडतरे आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा यावेळी गौरव करण्यात आला.
0000
हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळ बनावीत –: पालकमंत्री विजय शिवतारे
RELATED ARTICLES