भुईंज : सातारा जिल्हयात सुद्धा सापडणार हायड्रोकार्बनचे साठे डिझेल पेट्रोल व खनिज द्रव्याचे साठे कोरेगाव व वाई तालुक्यात 100 हून अधिक शेत जमीनीत बोरच्या सहाय्याने भुगर्भातील साठयांची माहिती कॅमेरा व उपग्रहाद्वारे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अल्फा जिओ इंडिया लिमिटेड चे पी. बालाभास्कर राव यांनी दिली.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना राव म्हणाले की, भारत सरकारच्या ओ.एन.जी.सी.च्या माध्यमातून देशभरात निवडक राज्यात भुगर्भातील खनीज द्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण रचेव चाचण्यांचे काम देण्यात आले आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्हया पासून ते सातारा जिल्हयापर्यंत शेत जमीनीत व उपग्रहावरून आलेल्या माहितीच्या आधारे बोरच्या सहाय्याने 100 ते 200 फूट भुगर्भात होल मारून त्यात कॅमेरे सोडून जी. पी. एस. प्रणालीद्वारे डाटा संकलित केला जात आहे. सोबत जमिनीतून पाणी व अन्य द्रव्यांचे नमुने तपासणीसाठी घेवून ते अमेरिका व साऊथ आफ्रिका येथे पाठवले जात आहेत अशी ही माहिती यावेळी देण्यात आली.
कोरेगाव तालुक्यातील सातारारोड़, रहिमतपूऱ, कुमठे़, शिरंबे़, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक़, वाठार स्टेशऩ, किनई या गावातील खनीज द्रव्ये नमुने घेतले आहेत तर वाई तालुक्यातील धोम,़ पसरणी, ़वाई़, भुईज, सुरूऱ, ओझर्डे़, पाचवड़, आसले या गावांचा समावेश आहे.
यापैकी भुईंज येथील बदेवाडी ते फुलेनगर खाटीक ओढा कृष्णानदीच्या पात्राजवळ 100 ते 150 बोर मारून आज सोमवारी प्रक्रिया पुर्ण केली असल्याची माहिती राव यांनी दिली.
बोर मारताना लागलेले पाणी हे शेतकरी यांना एैन उन्हाळ्यात वरदान ठरत आहे. त्यामुळे त्याठिकाणी त्याच बोरमध्ये पाणी काढण्याची मोटर टाकून लाभ घेत आहेत. तर सातारा जिल्हयात हा खनीज साठी मोठ्या प्रमाणात सापडल्यास येणार्या भविष्य काळात जिल्हयात रोजगारांची निर्मिती व खर्या अर्थाने देशाच्या आर्थिक योगदानात भरच पडणार आहे अशा प्रतिक्रिया भुईंज ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पुष्पा भोसले़ उपसरपंच प्रशांत जाधवराव़, सौ. शैला पिसाळ यांनी व्यक्त केल्या.