Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीअाैंध पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई

अाैंध पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) :-  खटाव तालुक्यातील चोराडे येथील फाटयाजवळ अवैध वाळू वाहतुक करणार्‍या डंपरवर कारवाई करण्यात आली,
अाैंध पोलीसांकडून मिळालेल्याअधिक माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमासास मायणी कडुन येत असलेल्या पिवळ्या रंगाच्या डंपर मधुन तीन ब्रास इतकी वाळू असल्याचे निदर्षनास आले, या डंपर चालक भरत संभाजी गोडसे
(वय ३३)रा.वडुज तर डंपर मालक किरण गोटया जाधव रा.वडुज यांचे डंपर नंबर MH11AY7272 हा स्वत:जवळ वाहन चालविण्याचा परवाना तसेच नमुद डंपरची कागदपत्रे न बाळगता बेकायदा बिगरपरवाना वाळू उत्खनन करुन डंपरमध्ये ३ ब्रास गाैण खनिज वाळू किंमत २१०००/-
तसेच डंपरची किंमत १००००००/- असा एकुण १०२१००० रूपयेचा माल चोरटी वाहतुक करित असलेने कारवाई करण्यात आली,
तरी अधीक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील करित आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular