म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने ) :- गोरेगाव(वांगी) ता.खटाव जि. सातारा येथे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रेयत्नाने मंजूर झालेल्या स्थानिक विकास निधी सण २०१७/१८ मधून माळी समाजासाठी सावता माळी मंदिरासमोर बांधलेल्या सामाजिक सभागृहाचा उदघाटन समारंभ कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की,सामाजिक सभागृहाचा उपयोग माळी समाजसह ग्रामस्थांना होणार आहे.सांस्कृतिक, धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने याचा वापर होणार आहे.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, सौ.भाग्यश्री भाग्यवंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सुरेश पाटील, संतोष घार्गे, सह्याद्रीचे संचालक संजय जगदाळे, वसंतराव घार्गे, लक्ष्मण घार्गे, सदाभाऊ कदम, महेश पाटील, अविनाश घार्गे, लक्ष्मणराव घार्गे, बबनराव कदम, महादेव शिंदे, आलम मुजावर, वसंत कदम, अशोक बनसोडे, दादासो सावंत, बाळासो कदम, आनंदराव कदम, प्रल्हाद शिंदे, भिमराव कदम, सदाशिव पाटील, दिलीप सावंत, ज्ञानदेव कोळी, साहेबराव शिंदे, हिंदुराव शिंदे, संतोष सावंत, ह.भ.प.धनाजी शिंदे, भिमराव कदम(फौजी),राजेंद्र शिंदे, दादासो कदम, गोरखनाथ माळी, शंकर माळी, हणमंत माळी, दादासो माळी, नानासो माळी, बाबुराव माळी, रामदास माळी, उत्तम माळी, इंजिनिअर पी. डब्लू.डी. पवार तसेच पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.