Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीबुद्धीबळाच्या पटावर रंगतोय जागतिक विश्वविक्रम!

बुद्धीबळाच्या पटावर रंगतोय जागतिक विश्वविक्रम!

तळमावले(संदीप डाकवे ) : आपल्या भारताला कला,क्रिडा,शास्त्र ह्याचा अमूल्य असा वारसा लाभलाय.भारतातील अनेक प्रतिभावंत कलावंत आपल्या अभूतपुर्व कलेतुन आपल्या भारताचं नावं जगाच्या इतिहासात कोरत असतात. असेच आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील विश्वविक्रमवीर, आबासाहेब शेवाळे ज्यांची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने 15 मार्च 2019 रोजी 2018-19 च्या सर्वोत्कृष्ट 100 मधे निवड करण्यात आली. आबासाहेब शेवाळे ह्यांनी ह्याआधी तीन विश्वविक्रम केलेत. आबासाहेब हे पुशपिन्सपासुन मोझेक पोट्रेट बनवण्यात सुप्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी पुशपिन्सपासुन मोझेक पोट्रेट बनवले आहेत ज्यात महेंद्रसिंग धोनी,अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि अनेक दिग्गजांचा सहभाग आहे . त्यांच्या ह्या पुशपिन्स पोट्रेटसची नोंद लिम्का बुकमधे नोंदवली आहे. ह्याशिवाय त्यांनी शिवाजी महाराजांचे कागदी पिशव्यांपासुन बनवलेले मोझेक पोट्रेट ज्याची नोंद *युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स* मधे झालीय, तसेच ऑक्टोबर 2018 मध्ये
विराट कोहलीच सर्वात मोठे मातीच्या पणत्यांपासुन बनवलेले मोझेक पोट्रेट ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. आता आबासाहेब शेवाळे आणि त्यांची टीम मिळुन सज्ज झाली आहे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी! बुद्धीबळाच्या सोंगट्यांनी साकार होणार एक अद्वितीय कलाकृती! क्रिकेट विश्वातील एक असामान्य व्यक्तिमत्व. एक असा चेहरा ज्याला अवघी दुनिया ममाहीफ म्हणुन ओळखते. भारताचा सुप्रसिद्ध कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी! सध्या पुन्हा एकदा जगभर वर्ल्ड कपचं उधाण सुरू आहे. शिवाय येत्या 7 जुलैला आपल्या ह्या लाडक्या क्रिकेटवीराचा वाढदिवस. असे दोन्ही औचित्य साधुन त्याला शुभेच्छा देण्यासाठी तसेच ह्या
आगळ्यावेगळ्या कलाकृतीसाठी तितक्याच आगळ्यावेगळ्या माणसाची निवड करावी म्हणुनच बुद्धीबळाच्या सोंगट्यापासुन साकार होणार आहे भारताचा कुल कॅप्टन अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी उर्फ आपल्या सर्वांचा लाडका माही ह्याची प्रतिकृती!
ही कला सादर करण्यामागे आबासाहेब शेवाळे ह्यांच्यासोबतच मोलाचे सहकार्य वर्ल्ड रेकॉर्ड् होल्डर आर्टिस्ट चेतन राऊत, मुकेश साळुंखे,संदीप बोबडे याचबरोबर ऋषिकेश झगडे, ऋषिकेश माने, मिलिंद भुनावरे,स्वप्निल खाडे, रुपेश तांडेल , अशा अजुन 22 मुलांनी दिवस रात्र कंबर कसून सुमारे 13 दिवस मेहनत घेतली आहे. सुमारे 1,41,000 लाल,काळ्या, फिकट पांढ-या, निळ्या,हिरव्या,पिवळ्या अशा विविध रंगांच्या सोंगट्यांचा वापर केला गेला आहे. तसेच ह्या पोट्रेटची लांबी 30 फुट आणि रूंदी 20 फुट आहे .ह्या अद्वितीय कलाकृतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 30 हुन अधिक कलाकारांनी त्यांचं स्वत:चं कसब पणाला लावुन ते पुर्णत्वास नेण्यास संपुर्ण प्रयत्न केलेत. आणि साकार झालीय न भुतो न भविष्यति अशी भव्य कलाकृती. बुद्धीबळ..मन शांत ठेवुन डोक्याने खेळला जाणारा खेळ.
ज्यासाठी स्थिर बुद्धी आणि एकाग्र चित्त ठेवावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला गाफील ठेवुन त्याला शह देऊन त्याच्यावर मात करणे हा ह्या खेळाचा मुख्य उद्देश्य असतो. पण तुम्हांला माहीतेय का बुद्धीबळामधे आपण जसं शह आणि मात देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटमधेही पायचीत करू शकतो, तेही समोरच्या खेळाडुला गाफील ठेवुन!
बुद्धीबळ आणि क्रिकेटमधील साधर्म्यच जणु हे! अनेक क्रिकेट खेळाडूंना स्टंप च्या मागून चेकमेट करणारा ममाहीफ हा असंख्य क्रिकेट प्रेमीच्या गळ्यातील ताईत आहे.क्रिकेटच्या शिरपेचातील मनस्वी राजाला आमच्या विश्वविक्रमी पोट्रेटने मानवंदना!

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular